'तो तर बेअक्कल फलंदाज', युवराज सिंगच्या वडिलांनी धोनीवर केले गंभीर आरोप

योगराज सिंह यांनी या सामन्यातील धोनीच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 06:38 PM IST

'तो तर बेअक्कल फलंदाज', युवराज सिंगच्या वडिलांनी धोनीवर केले गंभीर आरोप

चंदीगढ, 17 जुलै : ICC Cricket World Cup सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचे आव्हान संपुष्टा आले. यानंतर या पराभवाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर सर्वांनी धोनीच्या धिम्या फलंदाजीवरही टीका करण्यास सुरुवात केली. दरम्यान युवराज सिंगचे वडील योगराज सिंह यांनी तर भारताच्या पराभवामागे धोनीच असल्याचे सांगितले आहे. News 18 हरियाणा या स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत योगराज यांनी हे आरोप केले आहेत. त्यांनी "वर्ल्ड कप हरण्यामागे धोनी जबाबदार असून, त्यानेच मुद्दाम भारताला हरवलं. तो बेअक्कल फलंदाज आहे", अशी टीका केली.

वर्ल्ड कपमच्या सेमीफायनल सामन्यात धोनीनं अर्धशतकी खेळी केली. मात्र एक धाव काढण्याच्या नादात, धोनी धावबाद झाला. त्यावरून योगराज यांनी धोनीला कारणीभूत ठरवले. वर्ल्ड कपमध्ये धोनीवर धिम्या फलंदाजीमुळं टीका करण्यात आली होती. त्यानंर योगराज सिंह यांनी या सामन्यातील धोनीच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

वाचा- धोनीच्या निवृत्तीची Inside Story, आई-बाबा म्हणतात...

योगराज सिंग यांनी, "धोनी आणि जडेजा एकत्र फलंदाजी करत होते. जडेजा स्ट्राईकवर असताना तो फटकेबाजी करत होता, चौकार-षटकार लगावत होता. धोनीला सेमीफायनलमध्ये मोठे फटके खेळण्याची चांगली संधी होती, मात्र त्याने ती संधी दवडली. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना आक्रमक खेळतो. मग भारताकडून असा खेळ का करत नाही?, अशी टीका केली.

तसेच, "उपांत्य फेरीच्या सामन्यात जर धोनीनं रवींद्र जडेजासारखा खेळला असता तर आपण 48व्या ओव्हरमध्येच सामना जिंकू शकलो असतो. गेल्या 10-12 वर्षात धोनीने संघात जे राजकारण केलं, त्याचीच फळं म्हणून त्याला आता लोकांच्या टीकेला सामोरं जावं लागतंय"अशा शब्दांत योगराज सिंह यांनी धोनीबद्दलची आपली नाराजी मुलाखतीमध्ये व्यक्त केली आहे.

Loading...

वाचा- चाहत्यांसाठी खूशखबर! धोनी हे काम पूर्ण केल्याशिवाय निवृत्त होणार नाही

धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा

दरम्यान आता धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी संघात नसेल. तो यापासून दूर राहणार असला तरी संघात होणाऱ्या बदलासाठी तो मदत करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी वेस्ट इंडीजला जाणार नाही. भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल. त्याच्या जागी ऋषभ पंत यष्टीरक्षक म्हणून संघात खेळण्याची शक्यता आहे.

वाचा- आता तर शास्त्री आणि विराटही म्हणाले; धोनी तुझी गरज आहे, निवृत्ती घेऊ नको!

VIDEO : विमा कंपनीचा अधिकारी सापडला शिवसैनिकांच्या ताब्यात, पुढे काय घडलं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 06:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...