युवराज सिंगला प्रशासकीय समितीनं दिला मोठा धक्का, आता हातात बॅटही घेऊ शकणार नाही?

युवराज सिंगला प्रशासकीय समितीनं दिला मोठा धक्का, आता हातात बॅटही घेऊ शकणार नाही?

युवराज सिंगच्या क्रिकेटवरून बीसीसीआय आणि प्रशासकीय समितीत मतभेद.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सिक्सर किंग युवराज सिंग विदेशी लीगमध्ये सहभागी झाला होता. युवराजनं कॅनडामध्ये होत असलेल्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये भाग घेतला होता. मात्र युवराज सिंग आता क्रिकेट खेळू शकणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण युवराज सिंगवरून बीसीसीआय आणि प्रशासकीय समिती यांच्यात मदभेद होत आहेत.

युवराज सिंगनं ग्लोबल टी-20 लीगमध्ये सहभागी होण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर बीसीसीआयच्या परवानगीमुळं युवराजनं टोरंटो नॅशनल्स संघाचे कर्णधारपद स्विकारले. दरम्यान युवराजला परवानगी मिळाल्यामुळं इतर माजी क्रिकेटरही विदेशी लीग खेळण्यास उत्सुक आहे. मात्र प्रशासकीय समितीनं मात्र याबाबत वेगळे मत व्यक्त केले आहे.

निवृत्तीनंतर आयपीएल सोडून इतर लीग खेळण्यास मनाई

प्रशासकीय समितीनं आयपीएल वगळता इतर कोणत्याही लीग खेळण्यास माजी क्रिकेटपटूंना बंदी घातली आहे. दरम्यान सीओएच्या सदस्यांनी, युवराज सिंगच्या बाबतीत जे घडले तो एक अपवाद होता, असे मत व्यक्त केले. तसेच, यापुढे कोणत्याही माजी खेळाडूंना आयपीएल वगळता इतर लीग खेळण्यास परवानगी मिळणार नाही असेही स्पष्ट केले.

वाचा-धोनीला चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार करणाऱ्या भारतीय क्रिकेटरने संपवले जीवन!

बीसीसीआय आणि सीओएमध्ये मदभेद

दरम्यान या मुद्द्यावरून सीओए आणि बीसीसीआय यांच्यात वाद सुरू आहेत. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं, सर्व खेळाडूंना समान वागणूक दिली पाहिजे. सीओए खेळाडूंना वेगळी वागणूक देऊ शकत नाही. असे माजी खेळाडूही आहेत, ज्यांना इतर लीगमध्ये क्रिकेट खेळायचे आहे, मात्र या निर्णयामुळं त्यांना क्रिकेट खेळता येणार नाही. खरं तर खेळाडू भौगोलिकदृष्ट्या निवृत्त होत नाही. त्यामुळं त्यानं एक संधी द्यायला हवी, असे मत व्यक्त केले.

वाचा-भारताच्या आक्रमक क्रिकेटरची आर्थिक अडचणींना कंटाळून आत्महत्या

SPECIAL REPORT : 'झक्कास' शब्दावरून अनिल कपूर 'या' उद्योगपतीला खेचणार कोर्टात?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 04:14 PM IST

ताज्या बातम्या