Happy Birthday Yuvraj : भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या युवीचे 5 सुवर्ण क्षण

Happy Birthday Yuvraj : भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या युवीचे 5 सुवर्ण क्षण

भारताचा माजी ऑलराउंडर क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj singh) याचा आज वाढदिवस आहे. युवराज सिंग आज आपला 39 वा वाढदिवस (Happy Birthday Yuvraj Singh) साजरा करत असून आपल्या शानदार कामगिरीच्या बळावर त्याने अनेक वर्ष टीम इंडियाला मोठे विजय मिळवून दिले होते.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : भारताचा माजी ऑलराउंडर क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj singh) याचा आज वाढदिवस आहे. युवराज सिंग आज आपला 39 वा वाढदिवस (Happy Birthday Yuvraj Singh) साजरा करत असून आपल्या शानदार कामगिरीच्या बळावर त्याने अनेक वर्ष टीम इंडियाला मोठे विजय मिळवून दिले होते. आपल्या अलौकिक प्रतिभेच्या बळावर अनेक वर्ष टीम इंडियात स्थान मिळवलेल्या या खेळाडूने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये मोठा संघर्ष देखील केला. वेळोवेळी त्याने भारताला गरज असताना उत्तम खेळ करून विजय मिळवून दिला आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळताना युवराजचा खेळ बहरत गेला. 2000 साली वनडे टीममध्ये पदार्पण करणाऱ्या युवराजने भारताने जिंकलेल्या टी-20 आणि वन-डे वर्ल्डकपमध्ये मोलाची भूमिका पार पाडली होती.

आज युवराजच्या 39 व्या वाढदिवशी आपण त्याच्या कारकिर्दीतील पाच महत्वाच्या कामगिरींवर नजर टाकणार आहोत

1) स्टुअर्ट ब्रॉडला सहा सिक्स

दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या 2007 सालच्या टी-20 (T-20 World Cup 2007) वर्ल्ड कपमध्ये युवराजने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले सहा सिक्स आजही सर्वांच्या आठवणीत आहेत. 13 वर्षानंतर देखील तो क्षण क्रिकेट चाहत्यांच्या मनात असून टी-20 क्रिकेटमध्ये सलग सहा सिक्स मारणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. त्याच्या या शानदार कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने इंग्लंडचा त्या सामन्यात पराभव केला होता.

2)ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणात शानदार 84 धावा

2000 साली युवराजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून देत शानदार 84 धावांची खेळी केली होती. ICC Knockout कपमध्ये ग्लेन मॅकग्रा (Glen McGrath) आणि जेसन गेलीस्पी (Jason Gillespie) यांच्या वेगवान माऱ्यासमोर युवीने शानदार 84 धावांची खेळी केली होती.

3) नॅटवेस्ट सीरिज 2002

2002 मधील इंग्लडविरुद्धच्या नॅटवेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाने विजय मिळवल्यानंतर गांगुलीने (Sourav Ganguly) लॉर्ड्सच्या (Lords) बाल्कनीत टी-शर्ट काढून भारताचा विजय साजरा केला होता. पण या सामन्यात टीम इंडिया अडचणीत असताना, युवराज सिंग याने मोहम्मद कैफ(Mohammad kaif) याला साथीला घेत भारताला विजय मिळवून दिला होता. सीरिजमधील शेवटच्या मॅचमध्ये इंग्लंडच्या 325 रनचा पाठलाग करताना टीम इंडिया अडचणीत असताना युवराजने शानदार कामगिरी करत विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीमुळेच गांगुलीला टी-शर्ट काढून आनंद साजरा करता आला होता.

4)2008 चेन्नई टेस्ट

2008 मध्ये मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी झालेल्या चेन्नई टेस्टमध्ये टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात युवराजने मोलाची भूमिका बजावली होती. टीमची अवस्था 224 वर 4 अशी असताना युवराज सिंगने शानदार बॅटिंग करत भारताला विजय मिळवून दिला.

5) 2011 वर्ल्डकपमध्ये मॅन ऑफ द टूर्नामेंट

टीम इंडियाने 28 वर्षांनी जिंकलेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंग याने महत्त्वाची कामगिरी केली होती. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये त्याने आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या बळावर भारताला अनेक विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आपल्या ऑलराउंड कामगिरीने त्याने या स्पर्धेत 362 रन करण्याबरोबरच 15 विकेट देखील घेतल्या होत्या. ऑस्टेलियाविरुद्ध क्वार्टर फायनलमध्ये त्याने नाबाद 57 रनची खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. तर वेस्ट इंडिजविरुद्ध टीम अडचणीत असताना नाबाद 113 रनची खेळी करून भारताला जिंकवलं होतं. युवराजच्या या जबरदस्त कामगिरीमुळेच त्याला 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' पुरस्कार देखील मिळाला होता.

First published: December 12, 2020, 5:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या