‘धोनी एका दिवसात मोठा झाला नाही, मग पंतवर टीका का?’

‘धोनी एका दिवसात मोठा झाला नाही, मग पंतवर टीका का?’

भारताच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूनं ऋषभ पंतची बाजू घेतली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : महेंद्रसिंग धोनीच्या उत्तराधिकारी म्हणून संघात असलेला ऋषभ पंत चांगली कामगिरी करू शकलेला नाही. वर्ल्ड कपमध्ये शिखर धवनच्या जागी पंतला संघात स्थान मिळाले, पण त्याला एकही सामन्यात चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही पंत सपशेल अपयशी झाला. त्यामुळं पंतला संघात संघ व्यवस्थापनाकडूनही धमकी मिळाली.

मात्र, आता पंतची बाजू भारताच्या माजी क्रिकेटपटूनं केली आहे. भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगनं विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतचा बचाव केला आहे. युवराजनं नुकत्याच एका कार्यक्रमात पंतची बाजू घेत, “धोनी एका दिवसात स्टार खेळाडू झाला नाही, त्यामुळे पंतवर टीका करू नको”, असे सांगितले. युवराजनं यावेळी, “पंतला फॉर्ममध्ये यायचे असेल तर त्याला कर्णधार विराट कोहलीची मदत घ्यावी लागेल. भारतीय निवड समिती पंतला वर्ल्ड कपपासून संधी देत आहे. त्यामुळं पंतला खरी गरज मैदानावर टिकण्याची आहे”, असे सांगितले. युवी ‘द स्पोर्ट्स मुव्हमेंट’ या कार्यक्रमात बोलत होता.

एकदिवसीय, कसोटी आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये पंतला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. त्यामुळं निवड समितीचे प्रमुख एम. एस. के प्रसाद यांनी पंतला धमकी दिली आहे. यासाठी पंतच्या जागी इशान, किशन, संजू सॅमसन आणि इतर खेळाडूंचे पर्याय तयार केले आहे. याआधी भारतीय संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी फलंदाजांना सतत संधी दिली जाणार नाही, अशा शब्दात सुनावले होते. त्यामुळं पंतचे दिवस आता भरले आहे, असेच चित्र दिसत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरोधातही पंतनं त्याच चुका केल्या. त्यामुळं याचा भुरदंड त्याला भरावा लागणार आहे.

वाचा-टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळं भारताचा हुकमी एक्का कसोटी संघातून बाहेर

‘पंतवर टीका करण्यापेक्षा त्याच्याशी चर्चा करा’

37 वर्षीय युवराजनं, “मला नाही माहित पंतला काय झाले आहे. पण पंतवर टीका करण्यापेक्षा त्याच्याशी चर्चा करण्याची खरी गरज आहे”, असे सांगितले. पंत केवळ 21 वर्षांचा आहे, त्यामुळं कर्णधार आणि प्रशिक्षक यांची जबाबदारी आहे, त्याच्याशी संवाद साधावा असा सल्ला युवीनं दिला.

गंभीरनं केली निवड समितीवर टीका

युवीच्याआधी भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरनं पंतची शाळा घेतल्याबद्दल निवड समितीवर टीका केली आहे. गंभीरनं टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात “निवड समितीनं पंतसाठी बेजबाबदार, निष्काळजी असे शब्द वापरले नाही पाहिजेत. त्यामुळं पंत धावांसाठी नाही तर संघात आपली जागा मिळवण्यासाठी फलंदाजी करताना दिसत आहे. त्यामुळं तो बाद होत आहे”, असे लिहिले आहे. तसेच, कोणत्याही युवा खेळाडूला सांभाळून घेण्याची ही पध्दत नाही असेही गंभीरनं आपल्या लेखात लिहिले आहे. पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाज जमेत नसेल तर त्याला पाचव्या क्रमांकावर पाठवून पाहा, असा सल्लाही गंभीरनं दिला.

वाचा-पंतचे दिवस भरले! टीम मॅनेजमेंटनं दिली धमकी पण गंभीरनं घेतली बाजू

टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळू शकले का पंत?

पंतवर होणारी टीका विचारात घेता. तसेच रवी शास्त्री आणि विक्रम राठोड यांनी त्याला दिलेला इशारा पाहता आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये संघात जागा मिळवणे पंतसाठी अवघड होत चालले आहे. आक्रमक क्रिकेट आणि बेजबाबदार क्रिकेट यात फरक असतो, अशा शब्दात राठोड यांनी पंतला समज दिली होती. सध्या अशीही चर्चा सुरु आहे की, धोनीने निवृत्ती जाहीर न करण्याचे एक मुख्य कारण त्याला योग्य असा पर्याय मिळालेला नाही.

वाचा-कॅप्टन कोहली मैदानावरचा राडा पडला महागात, ICCने केली मोठी कारवाई

VIDEO: 'हिंदुस्तान आणि पाकिस्तानचं विभाजन सोपं होतं पण युतीची वाटणी सोपी नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2019 06:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading