Farewell Yuvi! युवराजने निवृत्ती जाहीर करताच आईला कोसळलं रडू

भारतीय संघाचा दिग्गज ऑलराऊंडर युवराज सिंगनं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली.

  • Share this:

भारतीय संघाचा दिग्गज ऑलराऊंडर युवराज सिंगनं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. यावेळी युवराजनं, आयुष्यात कोणत्याही आव्हानासमोर न हरता त्यांच्याशी दोन हात केले पाहिजेस असे मत व्यक्त केले. रक्ताच्या उलट्या येत असतानाही 2011च्या वर्ल्ड कपमध्ये तो खेळला आणि भारताला जगज्जेता बनवले.

युवराजनं मुंबईत पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. यावेळी त्याच्या प्रत्येक निर्णयावर ठामपणे उभी राहणारी, त्याच्या आजारपणात त्याच्या सोबत असणारी त्याची आई, यावेळी उपस्थित होती.

युवराज सिंग आपल्या आईच्या खुप जवळ होता. त्यानं निवृत्तीची घोषणा करताना, मी सर्वात आधी आईला याबाबत सांगितले होते, अशी कबुली दिली. माझी आईच माझी ताकद आहे, असंही म्हणायला युवराज विसरला नाही.

Loading...

2000 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या युवीनं तब्बल 19 वर्षांनी निवृत्ती घेतली. मात्र 2017मध्ये त्यानं शेवटचा सामना खेळला होता. निवृत्ती जाहीर करताना युवराजच्या आईला अश्रु अनावर झाले.

युवराजनं 40 कसोटी सामन्यात 33.92च्या सरासरीनं 1900 धावा केल्या आहेत. यात 3 शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या फिल्डिंगची चर्चा जास्त रंगली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 304 सामन्यात 36.55च्या सरासरीनं युवराजनं 8701 धावा केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 02:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...