Farewell Yuvi : अशी असेल फायटर युवराजची सेकंड इनिंग, सचिनकडून घेतला आदर्श

Farewell Yuvi : अशी असेल फायटर युवराजची सेकंड इनिंग, सचिनकडून घेतला आदर्श

याआधी युवराजनं कर्करोगग्रस्त लोकांच्या मदतीसाठी 2012 साली युव्ही कॅन नावाच्या संस्थेची स्थापना केली होती.

  • Share this:

मुंबई, 10 जून : भारताला दोन वर्ल्ड कप जिंकवून देणारा सिक्सर किंग युवराज सिंगनं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावेळी युवराज सिंग भावूक झाला होता. त्यानं आतापर्यंतच्या आपल्या करिअरला उजळणी देत, 2011चा वर्ल्ड कप जिंकणे आयुष्यातला सुवर्णमय क्षण असेल असे सांगितले. तसेच, यावेळी त्यानं, लहाणपणापासून मी वडिलांचं देशासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली देत गेल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत आणि खास करून 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रवासात अनेक चढउतार पाहिले.

यावेळी युवराजनं, या खेळानं कसं लढायचं, पडायचं आणि पुन्हा उठून कसं पुढे जायचं हे मला शिकवलं. यावेळी युवराजनं निवृत्तीसंदर्भात क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरशीही सल्ला-मसलत केल्याचे मान्य केले.

युवराजनं 40 कसोटी सामन्यात 33.92च्या सरासरीनं 1900 धावा केल्या आहेत. यात 3 शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या फिल्डिंगची चर्चा जास्त रंगली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 304 सामन्यात 36.55च्या सरासरीनं युवराजनं 8701 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कप गाजवणारा युवराज सिंग कॅन्सरमुळं काही काळ विश्रांती घेतली होती. पण 2017नंतर त्यानं एकदिवसीय सामना खेळलेला नाही.

सचिनचा घेतला आदर्श

निवृत्ती जाहीर करताना युवराजनं, "मी गेली दोन वर्ष निवृत्तीचा विचार करत असल्याचे मान्य करत, मला सचिन तेंडुलकरनं याबाबत अनेकवेळा सल्ले दिले असेही सांगितले. सचिननं मला सांगितलं की, तुझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द संपुष्टात आणायची की नाही, याचा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. हा निर्णय तुझ्याशिवाय कोणीही घेऊ शकत नाही. त्यानंतर मी हा निवृत्तीचा निर्णय घेतल्याचंही युवराज सिंग म्हणाला.

युवराज करणार हे काम

तसेच यापुढे मी कॅन्सरग्रस्त रुग्णांची सेवा करणार असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. मला जास्त टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही, याची खंत आहे. त्यानंतर कोणत्या क्रिकेटपटूमध्ये तू स्वतःला पाहतोस हा प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला, ऋषभ पंत चांगला खेळाडू आहे. त्यात मला स्वतःची प्रतिमा दिसते.

यु व्ही कॅन संस्था

याआधी युवराजनं कर्करोगग्रस्त लोकांच्या मदतीसाठी 2012 साली युव्ही कॅन नावाच्या संस्थेची स्थापना केली होती. स्वत: कॅन्सरचा बळी ठरल्यामुळं युवराजनं इतरांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं आता युवराज कॅन्सरग्रस्तांसाठी काम करणार आहे.

वाचा- युवराजच्या कारकिर्दीला पूर्णविराम ! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

वाचा- Farewell Yuvi! युवराजने निवृत्ती जाहीर करताच आईला कोसळलं रडू

वाचा- तब्बल साडे तीन वर्ष कॉफी डेटसाठी तरसला होता रोमान्स किंग युवराज सिंग

वाचा-रक्ताच्या उलट्या होत असतानाही भारताला जिंकवून दिला होता युवराजनं वर्ल्ड कप

क्रिकेटला गुड बाय करताना 'फायटर' युवराजच्या डोळ्यांत अश्रू , पाहा VIDEO

First published: June 10, 2019, 3:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading