17 ऑगस्ट:श्रीलंकेला टेस्ट मालिकेत हरवल्यानंतर आता टीम इंडिया वनडे मालिकेसाठी सज्ज होते आहे. पण युवराज सिंग आणि सुरेश रैना यो-यो फिटनेस चाचणीत अपयशी ठरल्यामुळे या एकदिवस मालिकेसाठी त्यांची टीम इंडियामध्ये निवड करण्यात आली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.
राष्ट्रीय अकादमीत फिटनेस चाचणी घेण्यात येते. सर्व खेळाडूंना ही चाचणी पार करावी लागते. ही चाचणी पार करण्यासाठी किमान १९.५ गुणांची आवश्यकता असते. या चाचणीत युवराज सिंग जेमतेम १६ गुण मिळवू शकला. कर्णधार विराट कोहली हा टीममधला सर्वाधिक फिट खेळाडू आहे. यो-यो चाचणीत त्याचा स्कोअर २१ आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा