मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पोलार्डच्या एकाच ओव्हरमधील 6 सिक्सचं गिब्जनं सांगितलं ‘मार्च कनेक्शन’, तर युवराज म्हणाला...

पोलार्डच्या एकाच ओव्हरमधील 6 सिक्सचं गिब्जनं सांगितलं ‘मार्च कनेक्शन’, तर युवराज म्हणाला...

वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका (West Indies vs Sri Lanka)  यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) रेकॉर्ड केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 मार्च : वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका (West Indies vs Sri Lanka)  यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) रेकॉर्ड केला आहे. पोलार्डनं या मॅचमध्ये एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले. ( Pollard smash 6 sixes in an over) पोलार्डनं अकिला धनंजय (Akila Dhananjay) याच्या एका ओव्हरमध्ये हा रेकॉर्ड केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड करणारा पोलार्ड हा तिसराच खेळाडू आहे. यापूर्वी युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि हर्षल गिब्ज (Herschelle Gibbs) यांनी ही कामगिरी केली होती. युवराजनं टी-20 क्रिकेटमध्ये तर गिब्जनं वन-डे क्रिकेटमध्ये हा रेकॉर्ड केला होता.

युवराज आणि गिब्जच्या क्लबमध्ये पोलार्ड सहभागी होताच या दोन्ही खेळाडूंनी त्यांची पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हर्षल गिब्जनं 2007 साली झालेल्या वन-डे मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये 6 लगावले होते. गिब्जनं म्हंटले आहे की, ‘मार्च महिना 6 सिक्स मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. मी 16 मार्च 2007 लगावले होते. तू 3 मार्च 2021 रोजी ही कमाल केली आहे. अभिनंदन कायरन पोलार्ड

March a popular month for hitting 6x6s

16/3/2007 and 3/3/2021 congrats @KieronPollard55 👊

— Herschelle Gibbs (@hershybru) March 4, 2021

युवराज सिंहनं 2007 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावले होते. त्यानंही पोलार्डचं अभिनंदन केलं आहे. 'सहा सिक्स मारणाऱ्या क्लबमध्ये पोलार्ड तुझं स्वागत. अतिशय सुंदर' या शब्दात युवराजनं पोलार्डचं अभिनंदन केलं आहे.

Welcome to the club @KieronPollard55 #sixsixes you beauty !!!⭐️ 🌟 ⭐️🌟⭐️🌟

— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) March 4, 2021

( वाचा : IND vs ENG : भारतीय स्पिनर्सची पुन्हा सरशी, इंग्लंड पहिल्या दिवशीच बॅकफुटवर )

श्रीलंकेच्या अकिला धनंजयनं (Akila Dhananjay) या मॅचमध्ये हॅट्ट्रिक घेतली. त्याला त्याचा आनंद फार काळ साजरा करता आला नाही. त्याला पुढच्याच ओव्हरमध्ये पोलार्डनं 6 सिक्स लगावले. त्य़ामुळे एकाच मॅचमध्ये हॅट्ट्रिक ते 6 बॉलमध्ये 36 रन हे दोन टोकाचे रेकॉर्ड करणारा धनंजय हा पहिलाच बॉलर बनला आहे.

First published:

Tags: Cricket, Kieron pollard, Yuvraj singh