युवराजसह निवृत्ती घेतलेले ‘हे’ भारतीय खेळाडू दुसऱ्या देशात खेळणार क्रिकेट!

युवराजसह निवृत्ती घेतलेले ‘हे’ भारतीय खेळाडू दुसऱ्या देशात खेळणार क्रिकेट!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सध्या भारतीय खेळाडू दुसऱ्या देशातून क्रिकेट खेळण्यास सज्ज झाले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सध्या भारतीय खेळाडू दुसऱ्या देशातून क्रिकेट खेळण्यास सज्ज झाले आहे. याआधी सिक्सर किंग युवराज सिंगनं निवृत्ती घेतल्यानंतर कॅनडामध्ये होत असलेल्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळण्यास सुरुवात केली. या स्पर्धेत युवीनं आपला दणका दाखवून दिला. असे असले तरी, युवी कर्णधारपद भुषवत असलेला संघ टोरंटो नॅशनल संघाचे स्पर्धेतील आव्हान आता संपुष्टात आले आहे. आता यानंतर युवी अबु धाबीमध्ये होत असलेल्या टी-20 लीगमध्ये खेळणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवीनं वेगवेगळ्या लीग खेळण्यास सुरुवात केली. आता तो अबु धाबीमध्ये होत असलेल्या टी-20 लीगमध्ये खेळणार आहे. युवराजसोबत नुकतीच निवृत्ती जाहीर केलेला अंबाती रायडूही खेळणार आहे. त्याचबरोबर भारताचा जलद गोलंदाज इरफान पठाणही या स्पर्धेत खेळणार आहे.

वर्ल्ड कप 2019मध्ये राखीव खेळाडू म्हणून निवड करूनही रायडूला संघात घेतले नव्हते. त्यामुळं वर्ल्ड कप सुरू होताच रायडूनं निवृत्ती जाहीर केली. त्यामुळं चेन्नई सुपरकिंग्जकडून आयपीएल खेळणारा रायडू निवृत्तीनंतर पहिल्यांदा मैदानात दिसणार आहे.

वाचा-INDvsWI 1st ODI पावसाच्या खेळानंतर मैदानावर विराट-गेल यांचा डान्स, पाहा VIDEO

रायडूला आली होती आइसलॅंडकडून नागरिकत्वाची ऑफर

निवृत्ती जाहीर करण्याआधी अंबाती रायडूला चक्क आइसलॅंड क्रिकेट बोर्डाकडून ऑफर देण्यात आली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नागरिकत्व मिळवण्याचे नियम आणि कायदे टाकले आहेत. तसेच, "अग्रवालनं 72.33च्या सरसरीनं केवळ तीन विकेट घेतल्या आहेत त्यामुळं अंबाती तू थ्रीडी चष्मा काढू शकतोस. आम्ही जी कागदपत्रे तयार केली आहेत, त्यासाठी सादा चष्माही पुरेसा आहे. तु आमच्या देशात ये, आम्हाला तुझी कदर आहे", असे मिश्किल ट्वीट केले होते.

वाचा-विंडीज दौऱ्यातून डावललं, विक्रमी द्विशतक करून गंभीरला टाकलं मागे

खेळाडूंसाठी ही असणार मोठी संधी

15 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत खेळाडूंना मोठी संधी मिळणार आहे. युएईमध्ये खेळलेल्या या लीगचे याआधी दोन हंगाम झाले आहेत. ज्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉग मॉर्गन, शेन वॉटसन, लसिथ मलिंगा आणि आंद्र रसेल यांसारखे खेळाडू खेळले आहेत. तर, पहिल्याच हंगामात भारतीय खेळाडू जहीर खान, आरपी सिंह आणि प्रवीण तांबे यांचा समावेश होता.

वाचा-INDvsWI 1st ODI : विराटला जाणवली धोनीची उणीव, पंत पडला कमी!

TikTok वर चमकण्यासाठी पठ्याने नदीत मारली उडी, त्यानंतर जे घडलं त्याचा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 01:55 PM IST

ताज्या बातम्या