हरभजनच्या सल्ल्यावर युवराज म्हणतो, 'तुला सांगितलं होतं की...'

हरभजन सिंगने टीम इंडियात चौथ्या क्रमांकासाठी एका खेळाडूचं नाव सुचवलं आहे. त्यावर युवराजने हरभजनची फिरकी घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 08:07 AM IST

हरभजनच्या सल्ल्यावर युवराज म्हणतो, 'तुला सांगितलं होतं की...'

मुंबई, 01 ऑक्टोंबर : भारतीय क्रिकेट संघासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? सातत्याने या क्रमांकावर वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. पण आतापर्यंत एकही फलंदाज चौथ्या क्रमांकावर जबाबदारीने खेळू शकलेला नाही. अनेक दिग्गजांनी यासाठी नावं सुचवली आहेत. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने पुन्हा एकदा चौथ्या क्रमांकासाठी पर्याय सुचवला आहे.

चौथ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सकडून खेळणारा फलंदाज सूर्यकुमार यादव योग्य पर्याय ठरू शकतो असं हरभजन सिंगने म्हटलं आहे. त्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने फिरकी घेतली. याआधी जेव्हा हरभजनने संजू सॅमसनचे नाव सुचवलं होतं. तेव्हा युवराजने म्हटलं होतं की, संघाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजाची गरज नाही. कारण त्यांच्याकडे आघाडीची फळी मजबूत आहे.

हरभजन सिंगने ट्विट करून मुंबई इंडियन्सचा फलंदाज सुर्यकुमार यादवच्या कामगिरीकडे दुर्लक्ष होत असल्याचं म्हटलं आहे. त्यानं एक फोटो शेअर करताना म्हटलं की, घरेलू क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव जबरदस्त कामगिरी करत आहे. तरीही त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळू शकत नाही हे कळण्यापलिकडे असल्याचं हरभजन म्हणाला.

Loading...

युवराजनं पुन्हा त्याच्या जुन्या उत्तराची आठवण हरभजनला करून दिली. युवराज म्हणाला की, तुला सांगितलं होतं. संघाला चौथ्या क्रमांकाची गरज नाही. त्यांची आघाडीची फळी मजबूत आहे.

VIDEO : उपमुख्यमंत्री कोण होणार? चंद्रकांत पाटील म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2019 08:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...