मुंबई, 10 जून : भारताला एकदिवसीय आणि टी 20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराज सिंगने सोमवारी निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर युवराजच्या एका खेळीची चर्चा जोरात होत आहे ती म्हणजे नेटवेस्ट मालिकेतील फायनल सामना. तोच सामना ज्यामध्ये तेव्हाचा कर्णधार सौरव गांगुलीने त्याचा शर्ट काढून हवेत फिरवला होती. लॉर्ड्सवर 13 जुलै 2002 ला झालेल्या सामन्यात युवराजने 63 चेंडूत 69 धावांची खेळी केली होती.
नेटवेस्ट सिरीजमधील हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा होता. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात युवराज सिंगने एकाकी झुंज दिली होती. त्याच्यासोबत दुसरा हिरो ठरला होता तो मोहम्मद कैफ. इंग्लंडने त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 325 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी 106 धावांची भागिदारी केली होती. सौरव गांगुली बाद झाल्यानंतर मधली फळी ढासळली आणि भारताची अवस्था 5 बाद 147 झाली. त्यानंतर विजयासाठी भारताला 156 चेंडूत 179 धावांची गरज होती.
भारत जिंकेल याची आशा नव्हती तेव्हा मैदानावर असलेल्या युवराज आणि मोहम्मद कैफने संघाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. युवराज आणि कैफने 121 धावांची भागिदारी केली. 42 व्या षटकात युवराज बाद झाला तेव्हा भारताला 48 चेंडूत 58 धावा हव्या होत्या.
शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात 18 चेंडूत 14 धावा होत्या. त्यावेळी भारताकडे 4 विकेट होत्या. पण 48 व्या षटकात सामना इंग्लंडच्या बाजूने झुकला. फ्लिंटॉफने टाकलेल्या षटकात 3 धावा देऊन 2 गडी बाद केले. पण शेवटच्या षटकात भारताने बाजी मारली.
वाचा- युवराजच्या कारकिर्दीला पूर्णविराम ! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
वाचा- Farewell Yuvi! युवराजने निवृत्ती जाहीर करताच आईला कोसळलं रडू
भारतीय क्रिकेटनं एक काळ असा अनुभवला आहे की, सचिन बाद झाल्यानंतर चाहते सामना बघत नसत. टीव्ही बंद करत तर स्टेडियममधूनही चाहते निघून जात असत. कैफने या सामन्यात 87 धावा केल्या. त्यालाच सामनावीरच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. या सामन्याची आठवण सांगताना कैफने म्हटलं होतं की, सचिन बाद झाल्यानंतर त्याचे आई वडील चित्रपट बघायला गेले होते. त्यांनी माझी खेळी बघितलीच नाही. मोहम्मद कैफने गेल्या वर्षी 13 जुलैला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
लॉर्ड्सवर मिळवलेल्या विजयाने आनंदीत झालेल्या कर्णधार सौरव गांगुलीने बाल्कनीत शर्ट काढून हवेत फिरवला होता. त्या विजयानंतर 16 वर्षांनी गांगुली म्हणाला की, मला त्याबद्दल वाईट वाटतं पण तेव्हा उत्साहाच्या भरात मी टी शर्ट काढला.
वाचा- तब्बल साडे तीन वर्ष कॉफी डेटसाठी तरसला होता रोमान्स किंग युवराज सिंग
वाचा-रक्ताच्या उलट्या होत असतानाही भारताला जिंकवून दिला होता युवराजनं वर्ल्ड कप
क्रिकेटला गुड बाय करताना 'फायटर' युवराजच्या डोळ्यांत अश्रू , पाहा VIDEO