मुंबई, 10 जून : भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. देशाला एकदिवसीय आणि टी20 वर्ल्ड़ कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा युवराज सिंग निवृत्तीची घोषणा करताना भावूक झाला. युवराजने त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना 2017 मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.
युवराज सिंगने निवृत्तीची घोषणा मुंबईत पत्रकार परिषदेत केली. आशिष नेहरा निवृत्त झाला त्यावेळी शेवटचा सामना दिल्लीत खेळवण्यात आला होता. त्या सामन्यानंतर नेहराने निवृत्ती घेतली. तू तशी विचारणा बीसीसीआयला केली होतीस का? असा प्रश्न युवराज सिंगला न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी अमित मोडक यांनी विचारला. त्यावर युवराज म्हणाला की, मी कोणालाच रिटायरमेंट मॅचबद्दल बोललो नव्हतो. माझ्यात चांगला खेळ शिल्लक असता तर मी ग्राऊंडवरूनच निवृत्त झालो असतो.
बीसीसीआयने योयो टेस्ट पास झाला नाहीस तरी तुझ्यासाठी शेवटचा सामना खेळवू असं म्हटलं होतं. पण मी नाही म्हणालो. मला रिटायरमेंट मॅच नको होती. जर योयो टेस्ट पास नाही झालो तर मी तसाच घरी जाईन असं सांगितल्याचं युवराज म्हणाला. तसेच मी योयो टेस्ट दिली आणि पाससुद्धा झालो. पण माझा खेळ पुर्वीसारखा राहिला नाही असेही युवराजने सांगितलं.
आतापर्यंतच्या आपल्या करिअरला उजळणी देत, 2011चा वर्ल्ड कप जिंकणे आयुष्यातला सुवर्णमय क्षण असेल असे सांगितले. तसेच, यावेळी त्यानं, लहाणपणापासून मी वडिलांचं देशासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली देत गेल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत आणि खास करून 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रवासात अनेक चढउतार पाहिल्याचं त्यानं सांगितलं.
यावेळी युवराजनं, या खेळानं कसं लढायचं, पडायचं आणि पुन्हा उठून कसं पुढे जायचं हे मला शिकवलं. यावेळी युवराजनं निवृत्तीसंदर्भात क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरशीही सल्ला-मसलत केल्याचे मान्य केले.
युवराजनं 40 कसोटी सामन्यात 33.92च्या सरासरीनं 1900 धावा केल्या आहेत. यात 3 शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या फिल्डिंगची चर्चा जास्त रंगली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 304 सामन्यात 36.55च्या सरासरीनं युवराजनं 8701 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कप गाजवणारा युवराज सिंग कॅन्सरमुळं काही काळ विश्रांती घेतली होती. पण 2017नंतर त्यानं एकदिवसीय सामना खेळलेला नाही.
क्रिकेटला गुड बाय करताना 'फायटर' युवराजच्या डोळ्यांत अश्रू , पाहा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा