गांगुलीला शुभेच्छा देताना युवीची BCCI वर टीका, दादाने मानले आभार

गांगुलीला शुभेच्छा देताना युवीची BCCI वर टीका, दादाने मानले आभार

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीयआच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर युवराज सिंगने त्याला शुभेच्छा देताना बीसीसीयआवर टीका केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने शनिवारी सौरव गांगुलीला बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याने बीसीसीआय़वर टीकाही केली. युवराज म्हणाला की, तुझी निवड योयो टेस्ट घेण्यात येत होती तेव्हा व्हायला हवी होती.

युवराजने जून महिन्यात निवृत्तीची घोषणा केली. तेव्हा तो म्हणाला होता की, योयो टेस्टमध्ये अपयशी झाल्यास निवृत्तीचा सामना खेळवण्याचा वादा केला होता. पण यात पास झाल्यानंतरही निवृत्तीचा सामना खेळण्यास मिळाला नव्हता.

गांगुलीला शुभेच्छा देताना युवराजने ट्विटमध्ये म्हटलं की, भारताचा कर्णधार ते बीसीसीआय अध्यक्ष महान व्यक्तीचा महान प्रवास. एका क्रिकेटपटूने प्रशासक होणं चांगलं असेल. ज्यामुळे खेळाडूंच्या नजरेतून प्रशासन चालवता येईल. जेव्हा योयो टेस्टची मागणी केली जात होती तेव्हा तु अध्यक्ष असतात तर बरं झालं असतं. गुडलक दादा असं युवराजनं म्हटलं आहे.

युवराजच्या ट्विटला उत्तर देताना गांगुलीने म्हटलं की, शुभेच्छांसाठी आभार, तु आम्हाला वर्ल्ड कप जिंकून दिला आहेस. आता वेळ आहे खेळासाठी काहीतरी चांगलं करण्याचा. तु माझा सुपरस्टार आहेस. देवं तुझं भलं करो अशा शब्दात गांगुलीने आभार मानले आहेत.

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बीसीसीआचे माजी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत घोषणा केली. 13 ऑक्टोबरला रात्री उशीरापर्यंत झालेल्या बैठकीत सौरव गांगुलीच्या नावावर अधिकृच शिक्कामोर्तब करण्यात आलं. दरम्यान सोमवारी, 14 ऑक्टोबरला राजीव शुक्ला यांनी याबाबत नियुक्ती केली.

राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती देताना, “आम्ही सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. तरी, 23 ऑक्टोबरला याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल”, असे सांगितले. 23 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयची निवडणुक होणार आहे. दरम्यान अध्यक्षपदासाठी फक्त सौरव गांगुलीचा फॉर्म आल्यानं बिनविरोधात निवड झाली आहे. तर, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा सचिव असतील.

मैदानात भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेल्या 47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशन(CAB)चा अध्यक्ष आहे. जर गांगुलीची आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली तर तो सप्टेंबर 2020पर्यंत या पदावर राहू शकेल.

अरे हा तर चमत्कार! सामन्यात कॅच पकडताना दिसला सुपरमॅन, पाहा LIVE VIDEO

नाणेफेकीत दोन कर्णधारांना हरवल्यावर विराटला आवरलं नाही हसू, पाहा VIDEO

SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 12:21 PM IST

ताज्या बातम्या