निवृत्तीनंतर पुन्हा दिसणार मैदानात युवराजची जादू, मागितली BCCIकडे मदत

युवराजनं निवृत्ती घेतल्यानंतर चाहत्यांनी बीसीसीआयकडे एक सामना खेळू द्या, अशी मागणी केली होती.

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 10:20 AM IST

निवृत्तीनंतर पुन्हा दिसणार मैदानात युवराजची जादू, मागितली BCCIकडे मदत

मुंबई, 19 जून : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनं आपल्या सेकंड इनिंगसाठी बीसीसीआयकडे मदत मागितली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिेकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराजनं बीसीसीआयकडून विदेशी टी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी मागितली आहे.

बीसीसीआयच्या सुत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, युवराजनं क्रिकेट बोर्डला पत्र लिहिले आहे. निवृत्ती घेतल्यामुळं युवराजला विदेशी लीग खेळण्यासाठी परवानगी मिळू शकते. गेल्या काही दिवसांपासून निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवराज काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल होते. आता युवराजनं विदेशी टी-20 लीगमध्ये खेळण्यास उत्सुक आहे. निवृत्तीनंतर युवीनं, "मी टी-20 क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहे. या वयात मी लोकांचे मनोरंजन करण्यासाठी क्रिकेट खेळायचे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये मला खेळायचे नाही", असे सांगितले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना विदेशी लीगमध्ये संधी नाही. बीसीसीआयच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्या खेळाडूंना विदेशी लीग खेळण्याची संधी मिळत नाही. याआधी सेहवाग, जहीर खान यांनी युएईमध्ये लीग खेळल्या होत्या. गेल्या महिन्यात इरफान खानही कैरेबियन लीग खेळला होता. त्यामुळं युवराज सिंगलाही विदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

युवराज सिंगने क्रिकेट कारकिर्दीला 2000 मध्ये सुरुवात केली होती. त्यावेळी भारताचे नेतृत्व कर्णधार सौरव गांगुलीकडे होते. क्रिकेटमध्ये जवळपास 19 वर्षांची कारकिर्द गाजवलेला युवराज निवृत्तीवेळी खूपच भावूक झाला. युवराज म्हणाला की, निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी सचिन तेंडुलकर आणि जहीर खान यांच्याशी चर्चा केली होती. युवराजनं निवृत्ती जाहीर केल्यानंतर ट्विटरवरुन त्याच्या पुढच्या वाटचालींना दिग्गज क्रिकेटपटू, त्याचे सहकारी आणि बॉलीवूड अभिनेत्यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र भारताचा सलामीचा फलंदाज हिटमॅन रोहित शर्मानं ट्विटवर, “ तुमच्या हातातून काही गेल्याशिवाय तुम्हाला कळत नाही, तुमच्याकडे काय होते. लव्ह यू भावा. पण तुला आणखी चांगला निरोप देता आला होता'', असे ट्विट केले होते. त्यानंतर चाहत्यांनी बीसीसीआयकडे युवराजला एक सामना खेळू द्या अशी मागणी केली होती.

निवृत्तीनंतर युवी करणार हे काम

Loading...

तसेच यापुढे मी कॅन्सरग्रस्त रुग्णांची सेवा करणार असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. मला जास्त टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही, याची खंत आहे. त्यानंतर कोणत्या क्रिकेटपटूमध्ये तू स्वतःला पाहतोस हा प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला, ऋषभ पंत चांगला खेळाडू आहे. त्यात मला स्वतःची प्रतिमा दिसते. याआधी युवराजनं कर्करोगग्रस्त लोकांच्या मदतीसाठी 2012 साली युव्ही कॅन नावाच्या संस्थेची स्थापना केली होती. स्वत: कॅन्सरचा बळी ठरल्यामुळं युवराजनं इतरांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं आता युवराज कॅन्सरग्रस्तांसाठी काम करणार आहे.

वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा- World Cup : गर्लफ्रेंडच्या ट्रॅपमध्ये अडकला होता हा खेळाडू, केली विक्रमी खेळी!

वाचा- बुमराहने शेअर केला 'हा' फोटो, चाहत्यांनी विचारलं अनुपमा आहे का?

SPECIAL REPORT : कॅट फाईट, वातावरण टाईट ; सानियाने वीणाला सुनावलं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 10:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...