युवराजचे शानदार दुहेरी शतक, 8 सिक्स मारत केल्या विक्रमी 230 धावा

युवराजचे शानदार दुहेरी शतक, 8 सिक्स मारत केल्या विक्रमी 230 धावा

कर्नल सीके नायडू ट्रॉफीमध्ये युवराजच्या फलंदाजीनं सर्वांचे लक्ष वेधले आहे. लवकरच भारतीय संघात त्याला स्थान मिळू शकते.

  • Share this:

खडगपूर, 17 फेब्रुवारी : कर्नल सीके नायडू ट्रॉफीमध्ये युवराजच्या फलंदाजीनं सर्वांचे लक्ष वेधले आहे. मात्र हा युवराज सिक्सर किंग युवराज सिंग नसून चंदीगडचा फलंदाज युवराज चौधरी आहे. खडगपूरच्या सेरसा क्रिकेट स्टेडियममध्ये मणिपूरविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यानं शानदार द्विशतक ठोकले. युवराज 215 चेंडूंत 230 धावा केल्या. या आक्रमक खेळीत 22 चौकारांचा समावेश होता. युवराजने 8 षटकार आणि 14 चौकारांत आपले शतक पूर्ण केले. युवराजच्या तुफानी खेळीमुळे चंदीगडने मेघालय विरोधात 674 धावांचा डोंगर उभा केला.

युवराजची विक्रमी कामगिरी

चंदीगड संघाने आपल्या पहिल्या डावात 2 विकेट गमावत 212 धावांपासून खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर 303 धावा केल्या. यानंतर युवराज चौधरी आणि तरनप्रीत सिंग आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी 7व्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. यानंतर युवराज चौधरीने अक्षित राणासह आठव्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. राणाने 53 धावा केल्या. यानंतरही युवराज चौधरी मैदानावर कायम राहिला आणि त्याने 9 व्या विकेटसाठी हर्षितबरोबर 188 धावांची भागीदारी केली. चौधरी 230 धावांच्या वैयक्तिक धावांवर झेलबाद झाला.

वाचा-धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार विराट आणि रोहित! ‘या’ दिवशी मुंबईत होणार सामना

वाचा-भारताच्या फलंदाजाचे कंबरडे मोडण्यासाठी किवी उतरवणार हुकुमी एक्का!

युवराज चौधरीची युवराज सिंगशी तुलना केली जाते!

युवराज चौधरीला चंदीगडचा युवराज सिंग म्हणतात. 18 वर्षीय फलंदाजाची युवराज सिंगसारखीच शैली आहे. युवराज चौधरी लांब षटकार मारण्यात तज्ज्ञ आहे. युवराजचे वडील एक शेतकरी आहेत आणि ते उत्तराखंडमधील रुड़की येथे वाढले आहेत. पण क्रिकेटपटू बनण्याच्या इच्छेमुळे त्याने चंदीगडला आणले आणि तो तेथील गुरसागर क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतो. युवराज चौधरीने 2017मध्ये आंतर-जिल्हा अंडर 16 स्पर्धेत 270 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर 37 विकेटही घेतल्या. युवराज चौधरी पंजाबकडून अंडर 14, 16 आणि 19 वर्षांखालील क्रिकेट खेळला आहे.

First published: February 17, 2020, 10:54 AM IST

ताज्या बातम्या