ऑल राऊंडर युसूफ पठाण डोपिंग टेस्टमध्ये दोषी, 5 महिन्यांसाठी निलंबन

ऑल राऊंडर युसूफ पठाण डोपिंग टेस्टमध्ये दोषी, 5 महिन्यांसाठी निलंबन

16 मार्चे 2017 ला, टी-20 सामन्याच्यावेळी ,बीसीसीआयच्या अँन्टी डोपिंग प्रोग्राम अंतर्गत युसूफच्या लघवीचे नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये टरब्युटलाईनचे अंश आढळून आले. टरब्युटलाईनच्या सेवनावर बंदी आहे. त्यामुळे या चाचणीत युसूफ दोषी आढळला.

  • Share this:

अमित मोडक, 09 जानेवारी : टीम इंडियाचा ऑल राऊंडर युसूफ पठाणवर उत्तेजक पदार्थाचं सेवन केल्या प्रकरणी 5 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आलीये. 16 मार्चे 2017 ला, टी-20 सामन्याच्यावेळी ,बीसीसीआयच्या अँन्टी डोपिंग प्रोग्राम अंतर्गत युसूफच्या लघवीचे नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये टरब्युटलाईनचे अंश आढळून आले. टरब्युटलाईनच्या सेवनावर बंदी आहे. त्यामुळे या चाचणीत युसूफ दोषी आढळला.

पण त्यावर युसूफ पठाणने, श्वसनाच्या आजारावर उपचार सुरू असल्याचा , खुलासा केला.आणि या उपचारादरम्यान टरब्युटलाईनचे सेवन केल्याचं युसूफनं स्पष्ट केलं. त्यानंतर युसूफ पठाणचा खुलासा,पुरावे आणि तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआयनं 5 महिन्यासाठी युसूफ पठाणवर निलंबनाची कारवाई केली.

15 ऑगस्ट 2017 पासून निलंबनाच्या कारवाईची अमलबजावणी झाली. 14 जानेवारी 2018 ला कारवाईचा कार्यकाळ संपणार आहे. उत्तेजक पदार्थाच्या सेवनाविरोधात बीसीसीआयनं कठोर धोरण स्वीकारलंय. त्यासाठी बीसीसीआयनं अँन्टी डोपिंग प्रोग्राम सुरू केलाय. तसंच त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी 24 तास हेल्पलाईन सुरू केली आहे. कुठल्याही उत्तेजक पदार्थाबाबत आणि त्याच्या सेवनाबाबत हेल्पलाईनवर खेळाडूंना व्यक्तिगत मार्गदर्शनही करण्यात येतं.

First published: January 9, 2018, 2:32 PM IST

ताज्या बातम्या