बाद झाल्यानंतर युसूफ पठाणनं काढला अजिंक्य रहाणेवर राग, VIDEO VIRAL

बाद झाल्यानंतर युसूफ पठाणनं काढला अजिंक्य रहाणेवर राग, VIDEO VIRAL

भरमैदानात रहाणे आणि युसुफ पठाण भिडले! खेळाडूंनी केली मध्यस्थी

  • Share this:

बडोदरा, 13 डिसेंबर : रणजी करंडक स्पर्धेत मुंबईने बडोद्यावर मोठा विजय मिळवत 6 गुण मिळवले आहेत. गुरुवारी मुंबईने बडोद्याला 309 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. मात्र, या सामन्यादरम्यान असे काहीतरी घडले ज्याची क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा नव्हती. दुसर्‍या डावात फलंदाज युसूफ पठाणनं बाद झाल्यानंतर मुंबईच्या अजिंक्य रहाणेशी पंगा घेतला. दोन्ही खेळाडूंमध्ये बराच काळ वाद सुरू होता आणि मुंबईच्या खेळाडूंना त्यात हस्तक्षेप मध्यस्थी करावी लागली.

रहाणे-पठाण यांच्यात वादविवाद

सामन्याच्या 48व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. या ओव्हरमध्ये युसूफ पठाण झेलबाद झाला, मात्र बराचवेळ तो पंचांशी हुज्जत घालत बसला. आकाश पार्करचा चेंडू युसूफ पठाणच्या पॅडवर आदळला परंतु पंचांनी त्याला झेलबाद दिले. पंचांच्या निर्णयामुळे युसुफ पठाण अत्यंत चिडला आणि क्रीजवरच उभा राहिला. युसूफ पठाणच्या क्रीझवर उभे राहिल्यानंतर अजिंक्य रहाणे त्याच्याकडे आला आणि दोघांमध्ये काही संभाषण सुरू झाले. हा संवाद बराच काळ चालला होता जेव्हा मुंबईच्या खेळाडूंनी रहाणेला युसूफ पठाणपासून दूर नेले. यानंतर युसुफ पठाणला पॅव्हेलियनमध्ये परत जावे लागले.

वाचा-लिलवाआधीच मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या , संघाकडे आहेत सर्वात कमी पैसे

वाचा-विराटशी पंगा घेण्यासाठी केजरिक विल्यम्स खेळणार IPL, ‘हा’ संघ लावणार बोली

मुंबईचा मोठा विजय

मुंबई आणि बडोदरा यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईने सर्वच विभागात उत्कृष्ठ कामगिरी करत विजय मिळवला. पहिल्या डावात मुंबईने 431 धावांचे विशाल लक्ष दिले होते. यात पृथ्वी शॉने 66, रहाणेनं 79, मुलानी 89 आणि शार्दुल ठाकूरनं 64 धावांची खेळी केली. यानंतर मुंबईने बडोद्याला 307 धावातच गुंडाळले. मुलानी गोलंदाजीमध्ये सर्वोत्कृष्ठ कामगिरी करत 6 विकेट घेतल्या. बडोद्याकडून केदार देवधरने 160 धावा केल्या. दुसर्‍या डावात मुंबईच्या सलामीवीर पृथ्वी शॉने शानदार फलंदाजी केली आणि अवघ्या 179 चेंडूत 202 धावा केल्या. तर, मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही नाबाद १०१ धावा फटकावत 409 धावांवर डाव घोषित केला. बडोद्याला 534 धावांचे लक्ष्य मिळाले आणि प्रत्युत्तरात त्यांनी फक्त 224 धावा केल्या. यासह मुंबईनं रणजी करंडकमध्ये आपला विजय नोंदवला.

वाचा-VIDEO : बाप असावा तर असा! सामन्याआधी रोहितला आली लेकीची आठवण आणि...

Published by: Priyanka Gawde
First published: December 13, 2019, 9:08 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading