टीम इंडियाला जिवे मारण्याची धमकी, ATSने केली मोठी कारवाई

टीम इंडियाला जिवे मारण्याची धमकी, ATSने केली मोठी कारवाई

भारतीय क्रिकेट बोर्डाला रविवारी टीम इंडियाला वेस्ट इंडिजमध्ये धोका असल्याची माहिती मिळाली होती.

  • Share this:

आसाम, 22 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट बोर्डाला रविवारी टीम इंडियाला वेस्ट इंडिजमध्ये धोका असल्याची माहिती मिळाली होती. बीसीसीआयला एक ई-मेल पाठवण्यात आला होती यात, भारतीय संघातील खेळाडूंच्या जिवाला धोका आहे. यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची सुरक्षा वाढवण्यात आली. मात्र, बीसीसीआयनं ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणात आता दहशतवाद विरोधी पथकानं एक युवकाला आसाममधून अटक केली आहे.

बीसीसीआयला धमकीचा मेला पाठवणारा हा युवक आसाममधील मोरेगांव येथील असून, त्याचे मानसिक संतूलन बिघडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या युवकाचे नाव ब्रजमोहन दास असून त्यांन बीसीसीआयला पाठवलेल्या मेलमध्ये, “जर भारतीय संघ आम्हाला शरण येत असेल तर, आम्ही त्यांना मारणार नाही”, असे लिहिले होते. दरम्यान असा मेल मिळाल्यानंतर बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआयला, “आम्ही सुरेक्षसंदर्भात चर्चा केली आहे. दरम्यान मिळालेला ई-मेल हा खोटा होता”, असे सांगितले. दरम्यान बीसीसीआय भारतीय संघाच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना करत आहेत”, अशी माहिती दिली होती.

दरम्यान या युवकाच्य़ा ई-मेलनंतर बीसीसीआयनं मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकानं जगिरोड पोलिसांच्या मदतीनं या युवकाचा शोध घेत त्याल अटक केली. या युवकाची सखोल चौकशी केल्यानंतर, त्याला मुंबईत पाठवण्यात येणार आहे. पोलिसांच्या चौकशीत या युवकानं हा मेल केवळ बीसीसीआयला पाठवण्यात आला होता, कोणत्याही क्रिकेटरला पाठवण्यात आला नव्हता, असे सांगितले आहे.

वाचा-टेस्ट चॅम्पियनशीपचा टीम इंडियाचा प्रवास होणार सुरू, येथे पाहा पहिला सामना LIVE

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आला होता ईमेल

पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ टीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघाला संपवण्याची धमकी देणारा ई-मेल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आला होता. पीसीबीनं आयसीसीला याबाबत माहिती देत बीसीसीआयला खेळाडूंची सुरक्षा वाढवण्यास सांगण्यात आले आहे. गृह मंत्रालयालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.

वाचा-अमिताभ बच्चन यांनी सांगितला रोहित शर्माच्या नावाचं अर्थ, वाचून व्हाल हैराण!

खेळाडूंनाही देण्यात आली माहिती

मीडिया रिपोर्टनुसार भारतीय संघाचे मॅनेजर सुनील सुब्रमण्‍यम यांनी खेळाडूंना याबाबत माहिती दिली आगे. तसेच, खेळाडूंना फिरण्यासाठी बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. निनावी मेलनंतर संघ व्यवस्थापनाने संघासोबत विशेष बैठक घेतली.

वाचा-टीम इंडियासाठी कसोटी मालिका महत्त्वाची, 60 गुणांसाठी होणार खरी लढत!

मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 03:47 PM IST

ताज्या बातम्या