मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'तुम्ही मुके-बहिरे असू शकत नाही', क्रिकेटपटूंवर भडकला ऑलिम्पिक विजेता अभिनव बिंद्रा

'तुम्ही मुके-बहिरे असू शकत नाही', क्रिकेटपटूंवर भडकला ऑलिम्पिक विजेता अभिनव बिंद्रा

भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता निशाणेबाज अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra) क्रिकेटपटू आणि बीसीसीआयवर (BCCI) चांगलाच भडकला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात देशात सुरू असलेल्या आयपीएलमुळे (IPL 2021) अभिनव बिंद्राने टीका केली आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 25 एप्रिल : भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता निशाणेबाज अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra) क्रिकेटपटू आणि बीसीसीआयवर (BCCI) चांगलाच भडकला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात देशात सुरू असलेल्या आयपीएलमुळे (IPL 2021) अभिनव बिंद्राने टीका केली आहे. क्रिकेटपटूंना एवढं तरी भान असलं पाहिजे, त्यांनी महामारीपासून वाचण्यासाठी लोकांपर्यंत संदेश पोहोचवावा. सध्याच्या परिस्थितीमध्ये खेळाडूंनी स्वत:च्याच आजूबाजूला पाहिले पाहिजे, असंही अभिनव बिंद्रा म्हणाला.

अभिनव बिंद्राने इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसमध्ये याबाबतचा लेख लिहिला आहे. 'खेळाडूंनी खूप काही कमावलं असतं आणि स्वत:च्या खेळाचे ते हिरो असतात, पण आपण कोणाचाही जीव वाचवत नाहीयोत, त्यामुळे आपल्या आजू-बाजूला काय होत आहे, त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. फ्रंटलाईन वर्कर्स खूप आयुष्य वाचवत आहेत. तेच खरे हिरो आहेत, त्यामुळे आपल्याला संधी मिळत असेल, तर आपणही जे शक्य आहे ते केलं पाहिजे,' असं आवाहन अभिनवने केलं.

'आयपीएलवरून सध्या वाद सुरू आहेत. या वातावरणात आयपीएल खेळवावं का? लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही स्पर्धा आहे का? असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहे. या परिस्थितीमध्ये मी कोणताही खेळ पाहण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. मी जेव्हा ट्विटरवर जातो आणि आयपीएलबद्दल एखादी बातमी येते, तेव्हा मी ती हटवून टाकतो, पण मी हे करतो. याचे सकारात्मक पैलूही असू शकतात. सध्या खूप नकारात्मकता पसरली आहे. माणूस आणि देश असल्यामुळे पुढे जाण्यासाठीही काही गोष्टींची गरज आहे,' असं अभिनवने लिहिलं आहे.

'आपण किती भाग्यशाली आहोत, याची जाणीव खेळाडूंना झाली पाहिजे, कारण सध्या ते आयपीएल खेळत आहेत. आयपीएलशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाने कोरोना व्हायरसबाबत योग्य संदेश देण्यात आपली भूमिका बजावली पाहिजे,' अशी मागणी अभिनव बिंद्राने केली.

बिजिंग ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा अभिनव बिंद्रा पुढे म्हणाला, 'जर मी बीसीसीआयचा अध्यक्ष असतो किंवा माझी क्षमता असती तर मी यातला बहुतेक पैसा दान केला असता. आयपीएलमधून मिळणारे पैसे मी लसीकरणासाठी किंवा दुसऱ्याची मदत करण्यासाठी दिले असते. आयपीएल दान करण्यासाठी नाही हे मला माहिती आहे.'

'क्रिकेटपटू आणि अधिकारी त्यांच्या दुनियेत राहू शकत नाहीत. बाहेर जे चाललं आहे त्याबाबत ते मुके किंवा बहिरे असू शकत नाहीत. स्टेडियमच्या आतमध्ये तुम्ही सामने खेळत आहात, आणि बाहेरून ऍम्ब्यूलन्स जात आहे, मी याचा विचार करतो. टीव्हीवर याचं कव्हरेज कसं होतं, हे मला माहिती नाही, पण या गोष्टी शांतपणे होत असतील तर चांगलंच आहे. समाजाप्रती सन्मान दाखवण्यासाठी तुम्ही जल्लोष न करता शांतपणे या गोष्टी करू शकता,' असं अभिनवने त्याच्या स्तंभामध्ये लिहिलं.

First published:

Tags: Coronavirus, IPL 2021