मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'मी मनोरंजनासाठी खेळत नाही', कोहलीच्या टीकेला टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचं सडेतोड उत्तर

'मी मनोरंजनासाठी खेळत नाही', कोहलीच्या टीकेला टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचं सडेतोड उत्तर

न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुजारावर धिम्या फलंदाजीवरून टीका केली होती. त्यावर आता पुजाराने उत्तर दिले आहे.

न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुजारावर धिम्या फलंदाजीवरून टीका केली होती. त्यावर आता पुजाराने उत्तर दिले आहे.

न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुजारावर धिम्या फलंदाजीवरून टीका केली होती. त्यावर आता पुजाराने उत्तर दिले आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
नवी दिल्ली, 16 मार्च : भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यात मानहानीकारक पराभव सहन करावा लागला. कसोटी मालिकेत तर एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. या मालिकेनंतर विराटनं भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांवर टीका केली होती. आता याच फलंदाजाने विराटला सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय संघाचा कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा आजकाल आपल्या फलंदाजीसाठी चर्चेत आहे. पुजारावर विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीनंतर धिम्या फलंदाजीसाठी टीका केली होती. आता विराटच्या या वक्तव्यावर अखेर पुजाराने मौन सोडले आहे. या सामन्यात पुजाराने पहिल्या डावात 42 चेंडूंत 11 धावा केल्या तर दुसर्‍या डावात त्याने 81 चेंडूत 11धावा केल्या. क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यातही पुजाराने 54 धावांसाठी 140 तर दुसऱ्या डावात 88 चेंडूंत 24 धावा केल्या होत्या. यामुळे पुजारावर टीका करण्यात आली होती. मात्र आता पुजाराने टीकाकारांना उत्तर दिले आहे. वाचा-भारतीय गोलंदाजाच्या घरी लगीनघाई! कोरोनाच्या धाकात उरकला साखरपुडा पुजाराच्या फलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्र संघाने बंगालला पराभूत करून प्रथमच रणजी करंडक जिंकला. या सामन्यात पुजाराने पुन्हा एकदा संथ, परंतु महत्त्वाचा डाव खेळला. पुजाराने 237 चेंडूत 66 धावा केल्या होत्या. वाचा-जर्मनीत अडकला भारताचा दिग्गज खेळाडू, कोरोनामुळे 15 दिवस तुटला कुटुंबाशी संपर्क माझी पद्धत युवा खेळाडूंसाठी नाही इंडियन एक्सप्रेसशी बोलताना चेतेश्वर पुजाराने आपल्या फलंदाजीच्या महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला. सद्यस्थितीत कोणालाही त्याच्यासारखे फलंदाज व्हायचे नाही, असे वाटते का असे विचारले असता, त्यांनी यावर स्पष्टपणे उत्तर दिले. पुजाराने यावेळी, “हो, सहमत आहे. पण तरुण पिढीला माझा खेळ समजतो. पण आता कसोटी सामने खूप कमी खेळले जात आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा मर्यादित षटकांच्या स्वरूपाच्या सामन्यांची संख्या वाढत जाते, तेव्हा तरुण पिढी माझी फलंदाजीची शैली स्वीकारत नाहीत कारण ते कसोटी क्रिकेटला अधिक अनुकूल आहेत", असे सांगितले. वाचा-‘रात्री स्वप्नात यायचा बुमराह आणि...’, दिग्गज फलंदाजाचा धक्कादायक खुलासा 'मी मनोरंजनासाठी खेळत नाही' चेतेश्वर पुजाराने यावेळी असे सांगितले की मी सोशल मीडियासाठी फलंदाजी करू शकत नाही. पुजाराने यावेळी, "सोशल मीडियावर भाष्य करणारे बहुतेक लोक माझा खेळ आणि कसोटी क्रिकेट समजत नाहीत, कारण ते अधिक वनडे आणि टी -२० क्रिकेट पाहतात. कृपया हे समजून घ्या, माझे ध्येय कोणाचे मनोरंजन करणे नाही आहे. माझ्या संघासाठी सामना जिंकणे हे आहे. मग ते भारतीय संघ असो वा सौराष्ट्र. काही दिवस मी वेगवान खेळतो, कधी सामन्यानुसार धिमी फलंदाजी करावी लागते", असे सडेतोड उत्तर टीकाकारांना दिले.
First published:

Tags: Cricket

पुढील बातम्या