मुंबई, 4 फेब्रुवारी : टीम इंडियाचा गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. चहल आपल्या डान्स स्टेप्समुळे तरुणांसोबत सेलिब्रेटींच्याही पसंतीस उतरला आहे. चहल नेहमी आपल्या वेगळ्यात अंदाजात आपल्या सहकाऱ्यांसोबत मौजमस्ती करताना दिसतो. आता पुन्हा एकदा चहल आपल्या अनोख्या अंदाजात डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. यावेळी तो एकटा नाही तर, टीमसोबत डान्स स्टेप्स करत आहे. यावेळी त्यानं सर्वांनाचं डान्स स्टेप करण्याचं आव्हान केलं आहे. #YuziCanDance म्हणत चहलनं आपल्या ग्रुपसोबत डान्स परफॉर्मन्स रिक्रिएट करण्याचं आव्हान केले आहे.
चहलने याआधी श्रेयस अय्यरसोबत क्रिकेटच्या मैदानावर डान्स केला होता. टीम इंडियानं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘विक्ट्री डान्स’ असं कॅप्शन देत चहलच्या डान्स स्टेप्स शेअर केल्या होत्या. आता पुन्हा चहलच्या या डान्स स्टेप्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. BCCI कडून चहलचा डान्स ट्विट करण्यात आला आहे. आता तुम्हाला चहलचा डान्स आपल्या ग्रुपसोबत रिक्रिएट करायचा असेल तर, हा डान्स नक्की पाहावा लागेल.
💃💃Challenge Alert 🕺🕺
Can you put on your dancing shoes and re-create this performance with your squad?
We will have @yuzi_chahal comment on his favourite ones. So get grooving people🕺
BCCIने केलेल्या ट्विटमध्ये चहलचा डान्स व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यरही दिसत आहे. दुसरीकडे एक ग्रुप चहलच्या डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये एक हॅशटॅगही वापरण्यात आहे. #YuziCanDance असं हॅशटॅग वापरत Challenge केलं आहे. आपल्या ग्रुपसोबत डान्स परफॉर्मन्स रिक्रिएट करण्याचं Challenge करण्यात आलं आहे. यावेळी हॅशटॅग वापरायला विसरू नका, असंही सांगण्यात आले आहे.
‘युझीडान्स’ स्टेप्सची भुरळ अभिनेता अनिल कपूरलाही पडल्याचं दिसत आहे. अनिल कपूर आपल्या ‘मलंग’ चित्रपटाच्या प्रमोशनाकरिता आले असता, त्यांनीही चहलचा डान्स पाहिला. इतकंच काय तर, अनिल कपूरने या डान्स स्टेप्स खास आपल्या स्टाईलने रिक्रिएट केल्या. यावेळी मलंगच्या टीमनेही ‘युझीडान्स’ स्टेप्स केल्या. दरम्यान, टीम इंडियाचा माजी क्रिकेटर इरफान पठाणनेही क्रिकेटच्या मैदानावर ‘युझीडान्स’ स्टेप्स केल्या. त्यामुळे चहलचा हा ‘युझीडान्स’ चांगलाच व्हायरल होत आहे.