Home /News /sport /

'तुम्ही ICC ट्रॉफीबद्दल बोलता, पण त्याने अजून IPL...' विराटच्या कॅप्टनसीवर रैनाचं मोठं वक्तव्य

'तुम्ही ICC ट्रॉफीबद्दल बोलता, पण त्याने अजून IPL...' विराटच्या कॅप्टनसीवर रैनाचं मोठं वक्तव्य

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमच्या फायनलमध्ये (WTC Final) पराभूत झाल्यापासून विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीवर टीका होत आहे.

    मुंबई, 12 जुलै : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमच्या फायनलमध्ये (WTC Final) पराभूत झाल्यापासून विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीवर टीका होत आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाने सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेत पराभव स्विकारला आहे. त्यामुळे अन्य देशांप्रमाणे भारतामध्येही लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटसाठी वेगळा कॅप्टन असावा. रोहित शर्मानं (Rohit Sharma) या टीमचं नेतृत्त्व करावं अशी मागणी होत आहे. या संपूर्ण विषयावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) याने मोठ वक्तव्य केलं आहे. सुरेश रैनानं 'न्यूज 24' शी केलेल्या बातचितमध्ये विराटबद्दल हे वक्तव्य केलं आहे. 'माझ्या मते तो नंबर 1 कॅप्टन आहे. त्यानं खूप काही मिळवलं आहे, हे त्याचा रेकॉर्ड सांगतो, तो जगातील नंबर 1 बॅट्समन आहे. तुम्ही आयसीसी ट्रॉफीबद्दल बोलता पण त्याने अजून एकही आयपीएल स्पर्धा जिंकलेली नाही. त्याला आणखी थोडा वेळ द्यायला हवा. आयसीसी स्पर्धा सलग होत आहेत. या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करणे सोपे नसते.  तुम्ही काही गोष्टी मिस करू शकता. ' असे रैनाने सांगितले. का झाला फायनलमध्ये पराभव? रैनानं यावेळी न्यूझीलंड विरुद्ध फायनलमध्ये पराभव का झाला याचे कारण देखील सांगितले आहे. 'तेथील परिस्थितीमुळे हा पराभव झाला असे मत अनेकांनी व्यक्त केले. मात्र माझ्या मते आपल्या बॅटींगमध्ये काही तरी कमतरता राहिली. मोठ्या बॅट्समननं जबाबदारी घेऊन पार्टनरशिप करायला हवी होती. Euro Cup 2020 Final : 'चक दे इंडिया' सारखीच आहे इंग्लंडच्या कोचची गोष्ट, शेवट मात्र... टीम इंडिया चोकर्स नाही. त्यांनी आजवर दोन 50 ओव्हर्सचे आणि एक 20 ओव्हर्सचा वर्ल्ड कप जिंकला आहे. येत्या 12 ते 16 महिन्यांमध्ये आणखी एक आयसीसी ट्रॉफी भारतामध्ये येईल अशी भविष्यवाणी देखील रैनानं केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Rohit sharma, Suresh raina, Virat kohli

    पुढील बातम्या