अरे देवा! WWEच्या रिंगणात अचानक घुसला राक्षस, VIDEO VIRAL

अरे देवा! WWEच्या रिंगणात अचानक घुसला राक्षस, VIDEO VIRAL

WWEच्या रिंगणात घडला भयंकर प्रकार, व्हिडिओ झाला व्हायरल.

  • Share this:

न्यूयॉर्क, 27 सप्टेंबर : रेसलिंगमधला सर्वात मोठा कार्यक्रम अशी ओळख असणाऱ्या डब्लुडब्युई WWE (World Wrestling Entertainment) या कार्यक्रमात एका धक्कादायक प्रकार नुकताच घडला. या कार्यक्रमात रेसलरची खेळी पाहून अनेकांनी घाम फुटतो. तसेच, अजूनही भारतातही या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी या रिंगणात एक अजब प्रकार घडला. चक्का WWEच्या रिंगणात एक राक्षस घुसला होता. त्याला पाहून खेळाडू, प्रेक्षक सगळेच बिथरले.

WWEमध्ये सोमवारी होत असलेल्या नाईट रॉ या कार्यक्रमात युनिवर्सल चॅम्पियन सेश रोलिन्स (Seth Rollins) आणि ब्रॉन स्ट्रॉमॅन (Braun Strowman) यांच्यात सामना सुरू होता. मात्र या सामन्यात मध्येच एक दुसरा नावजलेला रेसलर द फेंड (‘The Fiend') घुसला. मात्र त्यानं त्याचा चेहरा ब्रे वॉट राक्षसासारखा रंगवला होता. त्याचा हा चेहरा पाहून प्रेक्षकांसह सर्वांचा थरकाप उडाला.

वाचा-रोहितचा विराट अवतार! भरमैदानात गोलंदाजाला घातल्या शिव्या, VIDEO VIRAL

‘The Fiend' या नावानं चर्चेत असलेला ब्रे वॉट (Bray Wyatt) ने WWE Raw रिंगमध्ये जबरदस्त सामना झाला. यावेळी ब्रे वॉटनं ब्रॉन स्ट्रॉमॅनवर हल्लाबोल केला. जरम्यान ब्रे वॉटनं रिंगणात प्रवेश केला तेव्हा मुद्दाम अंधार करण्यात आला होता, त्यामुळं त्याचा चेहरा पाहून सर्वांना भिती वाटली.

वाचा-क्रिकेटपटूला भोवले 140 किलो वजन, आळशीपणामुळं झाला रनआऊट; पाहा हा VIRAL VIDEO

याच दरम्यान सेथ रोलिन्सवर ब्रे वॉटनं हल्ला चढवत त्याला आपली सिग्नेचर मुव्ह मॅंडिबल क्लॉ (Mandible Claw) दाखवत गारद केले. ब्रे वॉटच्या राक्षसी अवतारामुळे रोलिन्स बेशुध्द पडला.

वाचा-क्रिकेटला मिळाला मलिंगाचा डुप्लिकेट! यॉर्करचा VIDEO पाहून व्हाल हैराण

ओव्हरटेक करणं बेतलं जीवावर! ट्रकनं दुचाकीला चिरडलं, दुर्घटनेचा CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: WWE
First Published: Sep 27, 2019 04:26 PM IST

ताज्या बातम्या