मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WWE सुपरस्टार John Cena धोनीचा फॅन, इंन्स्टावर शेअर केलेल्या फोटोवर लाईक्सचा पाऊस!

WWE सुपरस्टार John Cena धोनीचा फॅन, इंन्स्टावर शेअर केलेल्या फोटोवर लाईक्सचा पाऊस!

John Cena ने शेअर केलेला MS Dhoni चा हा फोटो 2021 च्या T20 वर्ल्ड कप दरम्यानचा आहे. या फोटोमध्ये धोनी कोणाशीतरी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे करताना दिसत आहे. अवघ्या काही तासांत या फोटोला लाखो यूजर्सनी लाईक केले आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 14 नोव्हेंबर : टीम इंडियाचा माजी कर्णधार (Team India Former Captain) महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni Fan) फॅन फॉओईंग जबरदस्त आहे. या यादीत अनेक सेलिब्रिटी स्टार्स, दिग्गजांचा समोवेश आहे. आता WWE सुपरस्टार जॉन सीनाने (John Cena) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर महेंद्रसिंग धोनीचा फोटो अपलोड केला आहे. जॉन सीनाने या फोटोला कोणतेही कॅप्शन दिलेले नाही, मात्र धोनीच्या चाहत्यांच्या यादीत तोही सामील झाल्याचे निश्चित झाले आहे.

महेंद्र धोनीचा हा फोटो 2021 च्या T20 वर्ल्ड कप दरम्यानचा आहे. या फोटोमध्ये धोनी कोणाशीतरी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे करताना दिसत आहे. अवघ्या काही तासांत या फोटोला लाखो यूजर्सनी लाईक केले आहे. याआधी जॉन सिनाने विराट कोहली (Virat Kohli), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan), ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai)  अशा सेलिब्रिटींचे फोटो शेअर केले होते.

View this post on Instagram

A post shared by John Cena (@johncena)

टीम इंडियासाठी द्रविड-लक्ष्मण एकत्र, गांगुलीनं पुन्हा जमवली Very Very Special जोडी

T20 विश्वचषक 2021 साठी, भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) धोनीची भारतीय संघाचा मार्गदर्शक (Mentor) म्हणून नियुक्ती केली. मात्र, या स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिल्याने त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले नाही. भारताला पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाचा पराभव करत सलग तीन सामने जिंकले. पण अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी ते पुरेसे नव्हते. 40 वर्षीय धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने भारतासाठी 350 एकदिवसीय, 98 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 90 कसोटी सामन्यांमध्ये 17266 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 108 अर्धशतके आणि 16 शतके झळकावली. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीन आयसीसी जेतेपदे जिंकण्यात यश आले. यासह धोनीने चेन्नई सुपर किंग्जला (CSK) चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे.

राहुल द्रविड लागला कामाला, पहिल्याच दिवशी केलेली कृती वाचून वाटेल अभिमान

जॉन सिनाही भारतात लोकप्रिय

WWE चा 16 वेळचा चॅम्पियन जॉन Cena चे Instagram वर 16.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. तो भारतातही खूप लोकप्रिय आहे. जॉन सीनाने या वर्षी जुलैमध्ये मनी इन द बँक PPV मध्ये दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन केले. यानंतर, युनिव्हर्सल चॅम्पियनशिपमध्ये रोमन रेन्सकडून पराभव झाल्यानंतर तो WWE टीव्हीवर दिसला नाही.

First published:

Tags: MS Dhoni, Sports