S M L

मुंबई इंडियन्सच्या विजयाने 'ट्रिपल एच'ही भारावला, पाठवली खास भेट

थेट अमेरिकेतून मुंबई इंडियन्ससाठी एक भेटवस्तू आलीय. ही खास भेटवस्तू दिलीय ती WWE चा चॅम्पियन आणि सीओओ राहिलेल्या 'ट्रिपल एच' याने

Sachin Salve | Updated On: May 23, 2017 07:20 PM IST

मुंबई इंडियन्सच्या विजयाने 'ट्रिपल एच'ही भारावला, पाठवली खास भेट

23 मे :  आयपीएलचे जेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावलं आणि मुंबईच्या टीमवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आता तर थेट अमेरिकेतून मुंबईसाठी एक भेटवस्तू आलीय. ही खास भेटवस्तू दिलीय ती WWE चा चॅम्पियन आणि सीओओ राहिलेल्या 'ट्रिपल एच' याने. तसंच त्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विजय मिळवलेल्या मुंबईच्या टीमचे अभिनंदनही केलंय.

तब्बल १४ वेळा WWE चॅम्पियन ठरलेल्या ट्रिपल एच ने एक ट्विट करत असं म्हटलंय की, मुंबई इंडियन्सला जेतेपदाबद्दल शुभेच्छा.

आपल्याला माहितेय की, मुंबईने आयपीएलच्या फायनलमध्ये पुण्यावर एका धावेने रोमहर्षक विजय मिळवला होता.काय आहे गिफ्ट ?

ट्रिपल एच ने पाठवलेल्या या गिफ्टमध्ये एक WWE चॅम्पियनशिप बेल्ट असणार आहे. ज्याच्या दोन्ही बाजूंना मुंबई इंडियन्सचा लोगो आणि नावाची प्लेट लावलेली असेल.

(संग्रहित छायाचित्र)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2017 07:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close