मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कोण जिंकणार WTC Final? युवराज सिंगने केली भविष्यवाणी

कोण जिंकणार WTC Final? युवराज सिंगने केली भविष्यवाणी

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. 18-22 जूनमध्ये साऊथम्पटनला हा सामना रंगेल. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या मते मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल बेस्ट ऑफ थ्रीची व्हायला पाहिजे होती.

पुढे वाचा ...
    मुंबई, 6 जून : भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. 18-22 जूनमध्ये साऊथम्पटनला हा सामना रंगेल. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या मते मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल बेस्ट ऑफ थ्रीची व्हायला पाहिजे होती. तसंच भारतीय टीम सध्या नुकसानाच्या स्थितीमध्ये आहे, कारण टीम इंडिया कमी सरावासह फायनलला उतरेल आणि न्यूझीलंडच्या टीमकडे मात्र दोन टेस्टचा अनुभव असेल, असंही युवराज म्हणाला आहे. स्पोर्ट्स तकशी बोलताना युवराज म्हणाला, 'या स्थितीमध्ये बेस्ट ऑफ थ्री फायनल व्हायला पाहिजे होती, कारण जर तुम्ही पहिली मॅच गमावली तरी उरलेल्या दोन सामन्यांमध्ये पुनरागमन करू शकता. भारतीय टीमचं थोडं नुकसान होणार आहे, कारण न्यूझीलंड आधीच इंग्लंडविरुद्ध (England vs New Zealand) खेळत आहे. भारताला सरावासाठी 8-10 सत्र मिळतील, पण मॅचमध्ये खेळण्यासारखा दुसरा सराव नाही. भारत-न्यूझीलंड यांच्यात बरोबरीचा मुकाबला होईल, पण न्यूझीलंडला थोडा फायदा आहे.' भारताची बॅटिंग न्यूझीलंडपेक्षा जास्त मजबूत आहे, तर भारताची बॉलिंग न्यूझीलंडच्या बरोबर आहे. गेल्या काही काळात भारताने परदेशातही सामने जिंकले आहेत. रोहित शर्मा आता टेस्टमधलाही अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या नावावर 7 शतकं आहेत, यापैकी 4 ओपनर म्हणून आली आहेत. भारताची कामगिरी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) या दोन ओपनरवर अवलंबून असेल, पण या दोघांनी इंग्लंडमध्ये कधीच ओपनिंग केली नाही, असं युवराजने सांगितलं. 'ड्युक बॉलने खेळण्याचं मोठं आव्हान भारतीय टीमपुढे असेल. कारण ड्युक बॉल सुरुवातीला स्विंग होतो, त्यामुळे तुम्हाला इंग्लंडमध्ये प्रत्येक सत्रावर लक्ष ठेवून खेळावं लागतं. दुपारी तुम्ही रन करू शकता, पण चहानंतर पुन्हा बॉल स्विंग व्हायला सुरुवात होते. बॅट्समन म्हणून तुम्ही थोडी तंत्रात दुरुस्ती केलीत, तर यशस्वी होऊ शकता,' असा सल्ला युवराजने दिला. 'शुभमन गिल युवा आहे, त्याच्याकडे सध्या अनुभव नाही. ऑस्ट्रेलियातल्या यशाचा आत्मविश्वास त्याने मैदानात न्यावा. या आत्मविश्वासाने तो खेळला तर तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात यशस्वी होईल,' असा विश्वास युवराजने व्यक्त केला. आपल्या देशाकडून खेळताना आधीच शारिरिक आणि मानसिक तणावाचा खेळाडूंना सामना करावा लागतो, त्यात आता बायो-बबलमुळे गोष्टी आणखी कठीण झाल्या आहेत, लवकरच कोरोनाचं संकट दूर होईल आणि लोकं पुन्हा सामान्य आयुष्य जगू लागतील.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, Rohit sharma, Team india, Virat kohli, Yuvraj singh

    पुढील बातम्या