मुंबई, 21 मे : टीम इंडियाचा विकेट कीपर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलआधी (World Test Championship Final) आपला प्रतिस्पर्धी असलेल्या ऋषभ पंतबाबत (Rishabh Pant) वक्तव्य केलं आहे. ऋद्धीमान साहाच्या या वक्तव्यामुळे चाहते त्याचं कौतुक करत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये मला नाही, तर पंतला खेळायची संधी मिळाली पाहिजे, असं साहा म्हणाला आहे.
स्पोर्ट्स कीडासोबत ऋद्धीमान साहा बोलत होता. 'ऋषभ पंतने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे इंग्लंडमध्ये त्याला खेळवलं पाहिजे,' असं वक्तव्य साहाने केलं. प्रत्येक खेळाडूला अंतिम-11 मध्ये खेळण्याची अपेक्षा असते, पण साहाने केलेल्या या वक्तव्यामुळे त्याचं कौतुक होत आहे.
ऋषभ पंतने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या 11 मॅचमध्ये 41.37 च्या सरासरीने 662 रन केले, यामध्ये एक शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. मागच्या दोन टेस्ट सीरिजमध्ये ऋषभ पंतच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारताने विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने 3 सामन्यांमध्ये 68.50 च्या सरासरीने 274 रन केले. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये त्याने 6 इनिंगमध्ये 54 च्या सरासरीने 270 रन केले. मागच्या दोन सीरिजमध्ये पंतने विकेट कीपर म्हणूनही स्वत:ची कामगिरी सुधारली आहे. पंतने या दोन सीरिजमध्ये 21 विकेट घेतल्या.
दुसरीकडे ऋद्धीमान साहा याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधली कामगिरी निराशाजनक झाली. 6 टेस्टच्या 6 इनिंगमध्ये साहाने 17.40 च्या सरासरीने फक्त 87 न केले. साहाने या कालावधीमध्ये एकही अर्धशतक केलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Rishabh pant, Team india