• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final ड्रॉ किंवा टाय झाली तर काय होणार? काय आहे नियम?

WTC Final ड्रॉ किंवा टाय झाली तर काय होणार? काय आहे नियम?

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जून या कालावधीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये हा मुकाबला रंगेल. पण या सामन्याआधी बीसीसीआयने (BCCI) आयसीसीला (ICC) नियमांबाबत विचारणा केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 मे : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जून या कालावधीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये हा मुकाबला रंगेल. पण या सामन्याआधी बीसीसीआयने (BCCI) आयसीसीला (ICC) नियमांबाबत विचारणा केली आहे. ही मॅच टाय किंवा ड्रॉ झाली तर अशा परिस्थितीमध्ये काय होणार? असा प्रश्न बीसीसीआयने आयसीसीला विचारला आहे. आयसीसी येत्या काही दिवसांमध्ये याचं उत्तर देईल, अशी अपेक्षा बीसीसीआयने व्यक्त केली आहे. भारतीय टीमशी संपर्कात असणाऱ्या एका अधिकाऱ्याने पीटीआयसोबत संवाद साधला. 'ही दोन देशांमधली सीरिज नाही, त्यामुळे खेळाच्या वेगवेगळ्या परिस्थितीबाबत समाधानकारक उत्तर मिळणं गरजेचं आहे. आम्हाला तीन गोष्टींची माहिती हवी आहे. मॅच ड्रॉ, टाय किंवा पावसामुळे होऊ शकली नाही, तर काय होईल? येत्या काही दिवसांमध्ये आयसीसी भूमिका जाहीर करेल. आम्ही तारीख देऊ शकत नाही, पण लवकरच याबाबत समाधानकारक उत्तर मिळेल,' असं बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्टदरम्यान भारतीय टीम साऊथम्पटनमध्ये क्वारंटाईन असेल. पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला टीम इंडिया लंडनला पोहोचेल. यानंतर लगेचच ते साऊथम्पटनला रवाना होतील. इंग्लंडला पोहोचण्याआधी भारतीय टीम 24 मे रोजी मुंबईत बायो-बबलमध्ये प्रवेश करेल. मयंक अग्रवाल, आर.अश्विन, बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण बुधवारी चार्टर विमानाने मुंबईत पोहोचले, तर मोहम्मद सिराज, फिल्डिंग कोच आर.श्रीधर आणि महिला टेस्ट आणि वनडे टीमची कर्णधार मिताली राज हैदराबादवरून मुंबईत येतील. मुंबई-पुण्यातले खेळाडू 24 मे रोजी बायो-बबलमध्ये येतील. यामध्ये कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि महिला टीमची खेळाडू जेमिमाह रॉड्रीग्ज यांचा समावेश आहे. अपेंडिक्सच्या ऑपरेशननंतर केएल राहुलही मुंबईत आहे, तोदेखील 24 मे रोजीच बायो-बबलमध्ये येईल.
  Published by:Shreyas
  First published: