विराट कोहलीला आठवलं पहिलं प्रेम, लिहिलं लव्ह लेटर!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. विराटची टीम न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळेल.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. विराटची टीम न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळेल.

  • Share this:
    साऊथम्पटन, 12 जून : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. विराटची टीम न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळेल. यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज सुरू होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर विराटसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाही आहेत. कुटुंबासोबत असूनही विराटला त्याचं पहिलं प्रेम आठवलं आहे. यासाठी त्याने एक लव्ह लेटरही लिहिलं आहे. विराट हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो, त्यामुळेच तो सध्या जगातला सगळ्यात फिट क्रिकेटपटू आहे. कायम फिट राहण्यासाठी विराटला काही गोष्टींचा त्यागही करावा लागला आहे. नियमित व्यायामासोबत विराट भरपूर भाज्या-फळं आणि प्रोटीनही खातो. तीन वर्षांपूर्वी त्याने नॉन-व्हेज खाणंही सोडून दिलं आहे. एवढच नाही तर फिट राहण्यासाठी त्याने बटाटाही सोडला आहे, पण आता विराटला बटाट्याची खूप आठवण येत आहे. बटाट्यासाठी विराटने सोशल मीडियावर एक लव्ह लेटर लिहिलं आहे. कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पत्र शेयर केलं आहे, यामध्ये त्याने लिहिलं 'माझ्या प्रिय बटाट्या, मी तूला हे पत्र लिहित आहे, कारण माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. मला अजूनही आपली पहिली भेट आठवते. त्यावेळी मी तूला आलू पराठ्याच्या आतमध्ये बघितलं होतं. दुकानातून एका खर्या चाहत्याप्रमाणे मी तूला घरी घेऊन आलो होतो. मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा मी तुला थिएटरमध्ये भेटायचो आणि स्वत:च्या हातात ठेवायचो. तू सुंदर लाल केचअप घातलेला असायचास.' 'तुझ्याशिवाय माझं आयुष्य अधुरं आहे, जसं बटाट्याशिवाय कोबी. तुझ्यासोबत मटार असायचा. जेव्हापासून तू निघून गेलास, तेव्हापासून जिरंही अधुरं आहे आणि आयुष्य फिकं झालं आहे. मला आपला मसालेदार काळ आठवत आहे, बटाट्या. अजून कहाणी बाकी आहे, कारण प्रेमाला कोणताही अंत नसतो,' असं विराटने लिहिलं आहे.
    Published by:Shreyas
    First published: