मुंबई, 7 जून: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. 18-22 जूनमध्ये हा महामुकाबला रंगेल. साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या या सामन्याआधी न्यूझीलंडचे माजी कर्णधार ग्लेन टर्नर (Glenn Turner) यांनी विराट कोहलीच्या (Virat Kohli) सगळ्यात मोठ्या कमजोरीवर भाष्य केलं आहे. इंग्लंडमधील परिस्थिती स्विंग आणि सीम बॉलिंगसाठी अनुकूल असेल, तर विराट कोहलीला संघर्ष करावा लागेल, अशी भविष्यवाणी टर्नर यांनी केली आहे. इंग्लंडमधलं वातावरण महत्त्वाची भूमिका बजावेल, असं टर्नर यांना वाटत आहे.
'भारतातल्या खेळपट्ट्यांनी सीम बॉलिंगला मदत करायला सुरुवात केली असली तरी न्यूझीलंडमध्ये स्थिती अगदी वेगळी आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडमधली परिस्थिती सारखीच आहे. भारतीय टीमला न्यूझीलंड दौऱ्यात संघर्ष करावा लागला होता,' असं 74 वर्षांचे टर्नर म्हणाले.
'कोहली खेळपट्टी आणि परिस्थितीबाबत सतर्क नाही, असं मी म्हणणार नाही. जर खेळपट्टी आणि परिस्थिती सीम आणि स्विंगला मदत करणारी असेल, तर त्याला इतर खेळाडूंप्रमाणेच संघर्ष करावा लागेल. जसं न्यूझीलंडमध्ये झालं होतं, त्यामुळे मैदान आणि परिस्थिती पुन्हा एकदा महत्त्वाचे ठरतील,' असं टर्नर यांनी द टेलिग्राफशी बोलताना सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india, Virat kohli