WTC Final : टीम इंडियाच्या विजयात त्रिमूर्तींचा अडथळा, विराटलाही दिलाय त्रास

WTC Final : टीम इंडियाच्या विजयात त्रिमूर्तींचा अडथळा, विराटलाही दिलाय त्रास

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विलियमसन (Kane Williamson) यांना अजूनपर्यंत एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही.

  • Share this:

साऊथम्पटन, 15 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विलियमसन (Kane Williamson) यांना अजूनपर्यंत एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, त्यामुळे आपला पहिलाच किताब जिंकण्यासाठी हे दोन्ही खेळाडू जीवाची बाजी लावतील. टीम इंडियाला मात्र हा मुकाबला जिंकायचा असेल, तर न्यूझीलंडच्या त्रिमूर्तींना भेदावं लागणार आहे. या त्रिमूर्ती म्हणजे ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult), निल वॅनगर (Neil Wagner) आणि टीम साऊदी (Tim Southee). या तिन्ही फास्ट बॉलरनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीलाही भरपूर त्रास दिला आहे.

विराट कोहलीला बोल्ट, वॅनगर आणि साऊथी यांच्याविरुद्ध खेळताना फारसं यशंही मिळालं नाही. बोल्टविरुद्ध विराटने 12 इनिंगमध्ये 44 च्या सरासरीने 132 रन केले, तर वॅगनरविरुद्ध त्याला 6 इनिंगमध्ये 20 च्या सरासरीने 60 रन करता आले. साऊथीविरुद्ध विराटने 9 इनिंगमध्ये 36.3 च्या सरासरीने 109 रन केले. बोल्ट, साऊदी आणि वॅगनर यांनी प्रत्येकी 3-3 वेळा विराटला आऊट केलं आहे.

विराटची न्यूझीलंडविरुद्धची कामगिरी

या तीन बॉलर्सविरुद्ध विराट कोहलीला संघर्ष करावा लागला असला, तरी त्याचं न्यूझीलंडविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. विराटने न्यूझीलंडविरुद्ध 9 टेस्टच्या 17 इनिंगमध्ये 51.53 च्या सरासरीने 773 रन केले, यामध्ये 3 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध विराटचा सर्वाधिक स्कोअर 211 रन आहे.

विराटचं एकूण टेस्ट रेकॉर्ड बघितलं तर त्याने 91 सामन्यांमध्ये 52.38 च्या सरासरीने 7,490 रन केले. त्याच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 27 शतकं आणि 25 अर्धशतकं आहेत. 254 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये विराट कोहलीला फक्त एकच शतक करता आलं. 2019 साली कोलकात्यात झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराटने शतक झळकावलं होतं, त्यानंतर विराटला शतक करता आलेलं नाही.

न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये सगळे दिवस पावसाचा अंदाज आहे, तसंच खेळपट्टीही बाऊन्स असलेली आणि जलद असेल, असं पिच क्युरेटरने आधीच स्पष्ट केलं आहे, त्यामुळे ढगाळ वातावरणात न्यूझीलंडच्या बोल्ट, वॅगनर आणि साऊदीसमोर विराटसह टीम इंडियाला सावधपणे खेळावं लागेल.

Published by: Shreyas
First published: June 15, 2021, 4:46 PM IST

ताज्या बातम्या