WTC Final : विराट-रोहितसह मुंबईकर खेळाडूंची टीम इंडियाच्या बायो-बबलमध्ये एण्ट्री
WTC Final : विराट-रोहितसह मुंबईकर खेळाडूंची टीम इंडियाच्या बायो-बबलमध्ये एण्ट्री
विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) पुढच्या महिन्यात इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध 5 टेस्ट मॅचची सीरिज (India vs England) खेळवण्यात येणार आहे.
मुंबई, 25 मे : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया (Team India) पुढच्या महिन्यात इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध 5 टेस्ट मॅचची सीरिज (India vs England) खेळवण्यात येणार आहे. 18-22 जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवली जाईल. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम 2 जूनला इंग्लंडला चार्टर विमानाने रवाना होईल, पण त्याआधी खेळाडूंना मुंबईत बायो-बबलमध्ये राहावं लागणार आहे. यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा (Rohit Sharma), प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी मुंबईतल्या बायो-बबलमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीय पुरुष टीमसोबतच महिला टीमही इंग्लंडला रवाना होणार आहे. दोन्ही टीमला इंग्लंडला पोहोचण्याआधी कठोर क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे. मिताली राज, आर.अश्विन, मोहम्मद सिराज, मयंक अग्रवाल, वॉशिंग्टन सुंदर, आर.श्रीधर, भरत अरुण, झुलन गोस्वामी, इंद्राणी रॉय यांच्यासह अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आधीच मुंबईत पोहोचला आहे आणि त्यांच्या क्वारंटाईन कालावधीला सुरुवात झाली आहे.
सगळ्या खेळाडूंना बायो-बबलमध्ये एण्ट्री करण्याआधी आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह येणं गरजेचं होतं. तसंच खेळाडूंना हे रिपोर्ट घेऊन येणं बंधनकारक होतं. बीसीसीआयने यासाठी एका एजन्सीला काम दिलं आहे. ही एजन्सी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या कोरोना टेस्टवर लक्ष ठेवेल. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय टीम तीन दिवस तिकडेही क्वारंटाईन होईल, यानंतर त्यांच्या सरावाला सुरुवात होईल, पण क्वारंटाईन कालावधीमध्येही त्यांना ट्रेनिंगला परवानगी देण्यात यावी, यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.