Home /News /sport /

WTC Final : टीम इंडियासाठी न्यूझीलंडचे हे 6 खेळाडू आहेत धोकादायक

WTC Final : टीम इंडियासाठी न्यूझीलंडचे हे 6 खेळाडू आहेत धोकादायक

न्यूझीलंडने दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा (England vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. याचसोबत त्यांनी 2 टेस्ट मॅचची ही सीरिज 1-0 ने जिंकली. यानंतर आता न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) भारताविरुद्ध (India vs New Zealand) खेळणार आहे.

पुढे वाचा ...
    एजबॅस्टन, 13 जून : न्यूझीलंडने दुसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा (England vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला. याचसोबत त्यांनी 2 टेस्ट मॅचची ही सीरिज 1-0 ने जिंकली. यानंतर आता न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) भारताविरुद्ध (India vs New Zealand) खेळणार आहे. हा मुकाबलाही इंग्लंडमध्येच होणार आहे, त्यामुळे न्यूझीलंडच्या टीमचा आत्मविश्वास चांगलाच वाढला असेल. 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवली जाईल. या सामन्यात न्यूझीलंडचे 6 खेळाडू भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. डेवॉन कॉनवे न्यूझीलंडचा ओपनर डेवॉन कॉनवेने (Devon Conway) इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमधून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये कॉनवेने द्विशतक झळकावलं तर दुसऱ्या टेस्टमध्ये अर्धशतकी खेळी केली. या कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. कॉनवेने 4 इनिंगमध्ये 77 च्या सरासरीने 306 रन केले. 29 वर्षांच्या कॉनवेने 3 वनडेमध्ये एक शतक आणि एक अर्धशतकही केलं, तसंच 14 टी-20 मध्ये त्याने 4 अर्धशतकं ठोकली. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याचं रेकॉर्ड चांगलं आहे. रॉस टेलर न्यूझीलंडचा मधल्या फळीतला बॅट्समन रॉस टेलर (Ross Taylor) टीममधल्या वरिष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. न्यूझीलंडच्या सध्याच्या टीममध्ये तो भारताविरुद्ध सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये टेलरने एका अर्धशतकासह 127 रन केले, त्याची सरासरी 42 रनची होती. काईल जेमिसन फास्ट बॉलर काईल जेमिसनला (Kyle Jamieson) इंग्लंडविरुद्ध फक्त एकाच टेस्ट मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली, यात त्याने 3 विकेट घेतल्या. खालच्या क्रमांकावर जेमिसन चांगली बॅटिंगही करू शकतो, त्यामुळे त्याला अंतिम 11 मध्ये जागा मिळेल हे निश्चित मानलं जात आहे. फास्ट बॉलरची त्रिमूर्ती न्यूझीलंडच्या विजयात तीन फास्ट बॉलरनी योगदान दिलं. टीम साऊदी (Tim Southee), ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) आणि नील वॅगनर (Neil Wagner) यांनी न्यूझीलंडला टेस्ट क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. साऊदी आणि वॅनगरने या सीरिजमध्ये 7-7 विकेट घेतल्या, तर बोल्टला 6 विकेट मिळाल्या. तर दुसऱ्या टेस्टमध्ये संधी मिळालेला मॅट हेन्री (Mat Henry) यानेही 6 विकेट घेतल्या. या कामगिरीमुळे हेन्रीला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं, पण जेमिसनमुळे हेन्रीला फायनलमध्ये जागा मिळणं मुश्कील आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, New zealand, Team india

    पुढील बातम्या