मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC FINAL : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासाठी पहिल्या सामन्याआधीच खूशखबर!

WTC FINAL : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासाठी पहिल्या सामन्याआधीच खूशखबर!

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियासाठी खूशखबर आली आहे.

  • Published by:  Shreyas

लंडन, 8 जून : भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियासाठी खूशखबर आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर भारतीय खेळाडू तीन आठवड्यांचा ब्रेक घेणार आहेत. या विश्रांतीनंतर खेळाडू 14 जुलैला परत एकत्र येतील आणि इंग्लंडविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी तयारी करतील.

बीसीसीआयच्या (BCCI) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं, 'विराट आणि कोच रवी शास्त्री यांनी विश्रांती मिळेल, हे आधीच सांगितलं होतं. फायनल आणि इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज (India vs England) यांच्यात सहा आठवड्यांचं अंतर आहे. त्यामुळे आम्हाला खेळाडूंच्या देखरेखीच्या मुद्द्यावरही लक्ष ठेवावं लागेल. ब्रिटनमध्येच त्यांना विश्रांती घ्यावी लागेल. तिकडे ते सुट्टी एन्जॉय करू शकतात. मित्र परिवार आणि कुटुंबालाही भेटू शकतात.'

'खेळाडू एकत्रही वेळ घालवू शकतात, पण आपला वेळ कसा घालवायचा याचा निर्णय घ्यायला ते स्वतंत्र असतील. यातले अनेक खेळाडू बरेच वेळा ब्रिटनला गेले आहेत, तसंच तिकडे त्यांचे मित्रही आहेत. त्यांनाही ते भेटू शकतात,' असं अधिकारी म्हणाला.

विराट कोहलीनेही (Virat Kohli) इंग्लंडला रवाना होण्याआधी दोन सीरिजमध्ये 42 दिवसांचं अंतर असल्यामुळे तयारी प्रभावित होईल, असं वक्तव्य केलं होतं. तसंच या कालावधीमध्ये टीमला गरजेचा असलेला ब्रेक मिळेल, असं सांगितलं होतं. इंग्लंडविरुद्धची सीरिज संपल्यानंतर आयपीएलचे उरलेले 31 सामने होणार आहेत, यानंतर टी-20 वर्ल्ड कपही खेळवला जाणार आहे. त्यामुळे एवढा काळ बायो-बबलमध्ये राहणं खेळाडूंसाठी अडचणीचं आणि तणावपूर्ण ठरू शकतं.

भारत-इंग्लंड सीरिजचं वेळापत्रक

4-8 ऑगस्ट : पहिली टेस्ट, नॉटिंगहम

12-16 ऑगस्ट : दुसरी टेस्ट, लंडन

25-29 ऑगस्ट : तिसरी टेस्ट, लीड्स

2-6 सप्टेंबर : चौथी टेस्ट, लंडन

10-14 सप्टेंबर : पाचवी टेस्ट, मॅनचेस्टर

First published:

Tags: Cricket news, India vs england, New zealand, Team india