मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final : इंग्लंडला पोहोचली टीम इंडिया, राहुलने शेयर केला PHOTO

WTC Final : इंग्लंडला पोहोचली टीम इंडिया, राहुलने शेयर केला PHOTO

भारतीय क्रिकेट टीम (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) लंडनला पोहोचली आहे.

भारतीय क्रिकेट टीम (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) लंडनला पोहोचली आहे.

भारतीय क्रिकेट टीम (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) लंडनला पोहोचली आहे.

लंडन, 3 जून : भारतीय क्रिकेट टीम (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) लंडनला पोहोचली आहे. या दौऱ्यात टीम इंडिया इंग्लंडविरुद्धही (India vs England) टेस्ट सीरिज खेळणार आहे. भारतीय बॅट्सन केएल राहुल (KL Rahul) याने गुरुवारी विमानाजवळचा आपला फोटो शेयर केला आणि आपण लंडनला पोहोचल्याचं सांगितलं.

विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळणार आहे. हा सामना साऊथम्पटनमध्ये होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून 5 टेस्ट मॅचची सीरिज सुरू होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by KL Rahul👑 (@rahulkl)

केएल राहुलने शेयर केलेल्या या फोटोला इन्स्टाग्रामवर एका तासाच्या आत 5 लाख पेक्षा जास्त जणांनी लाईक केलं आहे. इंग्लंड पोहोचल्यानंतर भारतीय टीमला क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. इंग्लंडला रवाना होण्याआधीही भारतीय टीम मुंबईमध्ये क्वारंटाईन होती.

याआधी बीसीसीआयनेही (BCCI) भारतीय पुरुष आणि महिला टीमचा फोटो शेयर केला होता, या फोटोमध्ये सगळे खेळाडू विमानतळावर बसलेले दिसत आहेत. भारतीय महिला आणि पुरुष टीम एकाच विमानाने लंडनला गेले.

न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलआधी टीम इंडियाला फक्त 4 सराव सत्र मिळणार आहेत. तर न्यूझीलंडची टीम या मुकाबल्याआधी इंग्लंडविरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे, त्यामुळे किवी खेळाडूंचा ड्युक बॉलने चांगला सराव होणार आहे.

First published:

Tags: England, Kl rahul, Team india