WTC Final आधी इंग्लंडमध्ये बुमराहला 'भिडले' विराट-अजिंक्य

WTC Final आधी इंग्लंडमध्ये बुमराहला 'भिडले' विराट-अजिंक्य

टीम इंडियाने (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (World Test Championship Final) आधी शुक्रवारी साऊथम्पटनमध्ये जोरदार सराव केला. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या या महामुकाबल्याला आता अवघ्या एका आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे.

  • Share this:

साऊथम्पटन, 11 जून : टीम इंडियाने (Team India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (World Test Championship Final) आधी शुक्रवारी साऊथम्पटनमध्ये जोरदार सराव केला. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात होणाऱ्या या महामुकाबल्याला आता अवघ्या एका आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे, यासाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. यासाठी टीमने आज इंट्रा स्क्वाड मॅचही खेळली. बीसीसीआयने (BCCI) भारतीय खेळाडूंच्या या सामन्याचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले.

टीम इंडिया कोणत्याही मॅच प्रॅक्टिसशिवाय फायनल खेळण्यासाठी उतरणार आहे. भारतीय खेळाडू इंग्लंडला रवाना होण्याआधी मुंबईत आयसोलेशनमध्ये होते, यानंतर इंग्लंडला पोहोचल्यानंतरही त्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं होतं. सुरुवातीच्या तीन दिवसांमध्ये त्यांना एकमेकांना भेटण्याचीही परवानगी नव्हती. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळवली जाईल.

खेळाडूंनी इंट्रा स्क्वाड मॅचआधी नेटमध्ये सरावही केला. बीसीसीआयने खेळाडूंच्या या सरावाचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि कर्णधार विराट कोहली सराव करत होते. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि आर.अश्विन बॉलिंगचा सराव करत होते.

Published by: Shreyas
First published: June 11, 2021, 6:22 PM IST

ताज्या बातम्या