मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टीम इंडिया इंग्लंडमध्ये, पण क्वारंटाईन न होताच स्टेडियममध्ये कसे पोहोचले खेळाडू?

टीम इंडिया इंग्लंडमध्ये, पण क्वारंटाईन न होताच स्टेडियममध्ये कसे पोहोचले खेळाडू?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Chmapionship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम लंडनमध्ये पोहोचली आहे. लंडनमध्ये पोहोचल्यानंतर टीम साऊथम्पटनमध्ये दाखल झाली, यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्टेडियममधून काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले.

पुढे वाचा ...

लंडन, 3 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Chmapionship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम लंडनमध्ये पोहोचली आहे. लंडनमध्ये पोहोचल्यानंतर टीम साऊथम्पटनमध्ये दाखल झाली, यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्टेडियममधून काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले. खरं तर इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर खेळाडूंनी क्वारंटाईन होणं बंधनकारक होतं, पण तरीही त्यांनी स्टेडियममध्ये जाऊन फोटो कसे काढले, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये असलेल्या या स्टेडियममध्येच हॉटेल आहे आणि टीम इंडियाचे खेळाडूही याच हॉटेलमध्ये थांबले आहेत, त्यामुळे खेळाडूंनी सोशल मीडियावर हे फोटो शेयर केले. खरंतर मैदानात हॉटेल असल्यामुळेच आयसीसीने साऊथम्पटनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आयोजित केली. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार हा सामना लॉर्ड्सवर होणार होता, पण कोरोनाचं संकट आणि खेळाडूंच्या क्वारंटाईनमुळे तसंच स्टेडियममध्येच हॉटेल असल्यामुळे ही मॅच साऊथम्पटनमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर कोणताही खेळाडू हॉटेलच्या बाहेर पडू शकणार नाही. तसंच त्यांची रोज टेस्ट होणार आहे, तिन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 6 जूनपासून खेळाडूंचे छोटे-छोटे ग्रुप ट्रेनिंगला सुरुवात करतील. 12 जूनला टीमचा क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर सरावाला सुरुवात होईल. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध (India vs New Zealand) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 ते 22 जून या कालावधीमध्ये होणार आहे, तर 23 जून हा रिझर्व डे असणार आहे. पाच दिवसांचा खेळ पूर्ण झाल्यानंतरही जर ओव्हर पूर्ण झाल्या नाहीत, तर मॅच रेफ्री याचा निर्णय घेतील. जर मॅच ड्रॉ किंवा टाय झाली तर दोन्ही टीमना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल झाल्यानंतर 4 ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज सुरू होईल.

First published:

Tags: England, New zealand, Team india