WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, विराटने दाखवला या खेळाडूंवर विश्वास

WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा, विराटने दाखवला या खेळाडूंवर विश्वास

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये हा सामना रंगेल. या मुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे.

  • Share this:

साऊथम्पटन, 15 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये हा सामना रंगेल. या मुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून शार्दुल ठाकूर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि मयंक अग्रवाल यांना बाहेर ठेवण्यात आलं आहे. भारतीय टीम 20 खेळाडू आणि चार स्टॅण्डबाय खेळाडूंना घेऊन इंग्लंडला रवाना झाली आहे.

फायनलसाठी भारतीय टीम

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धीमान साहा, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज

साऊथम्पटनमध्ये फायनलच्या प्रत्येक दिवशी 70-80 टक्के पावसाचा अंदाज आहे. तसंच खेळपट्टी जलद असून त्यावर बाऊन्सही असेल असं साऊथम्पटनच्या पिच क्युरेटरने सांगितलं आहे. पाऊस, ढगाळ वातावरण आणि खेळपट्टी यामुळे जडेजा आणि अश्विन यांच्यापैकी एकाच स्पिनरना खेळवायचं का? तसंच इशांत शर्माला संधी द्यायची का मोहम्मद सिराजला? हे प्रश्न विराटसाठी डोकेदुखी ठरणार आहेत.

Published by: Shreyas
First published: June 15, 2021, 6:57 PM IST

ताज्या बातम्या