मुंबई, 29 मे : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जून ते 22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. दोन्ही टीम टेस्ट क्रिकेटच्या पहिल्या वर्ल्ड कपची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याआधी शुक्रवारी आयसीसीने (ICC) दोन्ही टीमना फायनलबाबतच्या नियमांमुळे थोडा दिलासा दिला. हा सामना ड्रॉ किंवा टाय झाला तर दोन्ही टीमना संयुक्तरित्या विजेता घोषित केलं जाईल, असं आयसीसीने सांगितलं.
आयसीसीच्या या निर्णयामुळे दोन्ही टीमवर थोडा कमी दबाव असेल. या मुकाबल्यासाठी भारताकडून दोन जण कॉमेंट्री करणार आहेत, यामध्ये सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांच्या नावाचा समावेश आहे.
कोरोना व्हायरसमुळे इंग्लंडमधले कठोर नियम आणि 10 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी यामुळे भारतीय आणि न्यूझीलंडच्या अनेक खेळाडूंनी कॉमेंट्री करायला नकार दिला, पण गावसकर आणि कार्तिक या दोघांनीच कॉमेंट्री करायला होकार दिला. फायनलसाठीच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये न्यूझीलंडचे सायमन डूल, इंग्लंडचे मायकल अथर्टन आणि नासीर हुसेनदेखील आहेत.
सुनिल गावसकर या क्षेत्रात अनुभवी आहेत, तर दिनेश कार्तिक पहिल्यांदाच कॉमेंट्री करणार आहे. या सामन्यानंतर कार्तिक ऑगस्ट महिन्यात द हंड्रेडमध्येही कॉमेंट्री करताना दिसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Team india