WTC Final : 'ऑल टाईम ग्रेट' नसलेला अश्विन का 'बिट्स ऍण्ड पिसेस' जडेजा? मांजरेकरांच्या टीममध्ये कोण?

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. या सामन्यासाठी संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी टीम इंडियाची निवड केली आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. या सामन्यासाठी संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी टीम इंडियाची निवड केली आहे.

  • Share this:
    मुंबई, 15 जून : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) हे त्यांच्या निरिक्षणामुळे अनेकदा चर्चेत असतात, त्यांच्या या मतांमुळे अनेकवेळा त्यांच्यावर टीकाही होते. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भारताचा स्पिनर आर.अश्विन (R Ashwin) हा अजून ऑल टाईम ग्रेट नसल्याचं सांगितलं होतं, त्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता, तर 2019 वर्ल्ड कपमध्ये मांजरेकर रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) बिट्स ऍण्ड पिसेस खेळाडू म्हणजेच थोडी बॉलिंग आणि थोडी बॅटिंग करू शकणारा अशी उपमा दिली होती. मांजरेकरांच्या या वक्तव्यामुळे जडेजाने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून मांजरेकर यांच्यावर सडकून टीका केली होती. भारतीय टीम आणि खेळाडूंबाबत कायमच वक्तव्य करणाऱ्या संजय मांजरेकर यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठीची (World Test Championship Final) भारतीय टीम निवडली आहे. मांजरेकर यांनी त्यांच्या टीममध्ये फक्त एकाच स्पिनरला संधी दिली आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या सामन्यात दोन स्पिनर खेळवावे का एक याबाबतचा कठोर निर्णय कर्णधार विराट कोहलीला घ्यावा लागणार आहे, पण मांजरेकर यांच्या मते फक्त अश्विनलाच या सामन्यात खेळवलं गेलं पाहिजे. मांजरेकर यांनी त्यांच्या टीममधून रविंद्र जडेजा आणि फास्ट बॉलर इशांत शर्मा (Ishant Sharma) यांनाही बाहेर ठेवलं आहे. रविंद्र जडेजा हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्ये आक्रमक खेळी करणाऱ्या जडेजाने इन्ट्रा स्क्वाड सामन्यातही ऑलराऊंड कामगिरी केली होती. जडेजाने सराव सामन्यात 74 बॉलमध्ये 56 रन केले. याचसोबत मांजरेकरांनी 101 टेस्टचा अनुभव असलेल्या इशांत शर्माऐवजी नवख्या मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) टीममध्ये निवडलेलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिराजने उत्कृष्ट कामगिरी केली होती. इशांत शर्मा याला इंग्लंडमध्येही 12 टेस्ट खेळण्याचा अनुभव आहे. मांजरेकरांची टीम रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, हनुमा विहारी, आर.अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
    Published by:Shreyas
    First published: