• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • एकही रन, विकेट आणि कॅच नाही, तरीही त्याची टीम इंडियात निवड कशी?

एकही रन, विकेट आणि कॅच नाही, तरीही त्याची टीम इंडियात निवड कशी?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाला (Team India) पराभवाचा धक्का लागला, यानंतर आता टीमच्या निवडीवर आणि रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाला (Team India) पराभवाचा धक्का लागला, यानंतर आता टीमच्या निवडीवर आणि रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या फास्ट बॉलरनी धमाकेदार कामगिरी केली, पण भारताचे बॉलर सपशेल अपयशी ठरले. भारताकडून फक्त मोहम्मद शमीनेच (Mohammad Shami) भेदक बॉलिंग केली, तर भारताचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) या सामन्यात खराब कामगिरी केली. दोन्ही इनिंगमध्ये बुमराहला एकही विकेट मिळाली नाही, तसंच बॅटिंगमध्येही तो दोन्ही इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट झाला, तसंच त्याने फिल्डिंगमध्ये एकही कॅच पकडला नाही. जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर दुसऱ्या इनिंगमध्ये चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) स्लिपमध्ये रॉस टेलरचा कॅच सोडला, तर बुमराहने मॅचमध्ये एक कॅचही सोडला. बुमराहच्या या कामगिरीवर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी सदस्य साबा करीम (Saba Karim) यांनी टीका केली आहे, तसंच त्याच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. इंडिया न्यूजशी बोलताना साबा करीम म्हणाले, 'निवड समितीने सध्याचा फॉर्म न बघता खेळाडूचं नाव आणि त्याची प्रतिष्ठा पाहून निवड केली. बुमराह सध्या त्याच्या करियरच्या खराब काळातून जात आहे. ऑस्ट्रेलियात दुखापत झाल्यानंतर बुमराह लाल बॉलने क्रिकेटही खेळला नव्हता, तसंच पांढऱ्या बॉलनेही त्याने फक्त टी-20 क्रिकेट खेळली. तो इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात झालेल्या सीरिजमध्येही खेळला नव्हता. टेस्ट क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर तो अजिबातच फॉर्ममध्ये नव्हता.' बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चेन्नईत झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. स्पिनरना मदत करणाऱ्या त्या खेळपट्टीवर बुमराहने 4 विकेट घेतल्या होत्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दुसऱ्या इनिंगमध्ये बुमराह फॉर्ममध्ये परत येत होता, असं वाटल्याची प्रतिक्रिया साबा करीम यांनी दिली. 'दुसऱ्या इनिंगमध्ये बुमराहला त्याची लय परत सापडत होती, पण अनेकवेळा तो कमनशिबी राहिला. फिल्डरनीही त्याला साथ दिली नाही. माझ्यासाठी हा चिंतेचा विषय आहे. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजआधी सुधारण्याची गरज आहे,' असं वक्तव्य साबा करीम यांनी केलं.
  Published by:Shreyas
  First published: