मुंबई इंडियन्सच्या बॉलरचा इंग्लंडमध्ये धुमाकूळ, WTC Final आधी टेन्शनमध्ये विराट

मुंबई इंडियन्सच्या बॉलरचा इंग्लंडमध्ये धुमाकूळ, WTC Final आधी टेन्शनमध्ये विराट

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला (World Test Championship Final) 18 जूनपासून सुरुवात होणार आहे. पण त्याआधी न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंनी टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे.

  • Share this:

लंडन, 12 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला (World Test Championship Final) 18 जूनपासून सुरुवात होणार आहे. पण त्याआधी न्यूझीलंडच्या दोन खेळाडूंनी टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे. या महामुकाबल्याआधी न्यूझीलंडची टीम इंग्लंडमध्ये दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे, यातल्या दुसऱ्या सामन्यात रॉस टेलर (Ross Taylor) आणि ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) यांनी धमाकेदार कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये बोल्टने 85 रन देऊन 4 विकेट घेतल्या.

ट्रेन्ट बोल्टने भारताविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. बोल्ट भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा न्यूझीलंडचा चौथ्या क्रमांकाचा बॉलर आहे. बोल्टने तिन्ही फॉरमॅटमध्ये 25 सामने खेळून तब्बल 66 विकेट घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने भारताविरुद्ध 9 मॅच खेळून 36 विकेट मिळवल्या. 2020 साली भारताविरुद्धच्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्येही बोल्टने टीम इंडियाला खूप त्रास दिला होता. 2 मॅचमध्येच त्याने भारताचे 11 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये पाठवले. चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) बोल्टने 4 वेळा आऊट केलं आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये रॉस टेलरने 80 रनची खेळी केली आहे. न्यूझीलंडच्या सध्याच्या बॅट्समनमध्ये रॉस टेलरने भारताविरुद्ध सर्वाधिक 812 रन केले आहेत, यामध्ये 3 शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. केन विलियमसनने (Kane Williamson) भारताविरुद्ध 728 रन आणि टॉम लेथमने 345 रन केले. विलियमसनने (Kane Williamson) भारताविरुद्ध 2 शतकं आणि 4 अर्धशतकं केली.

ट्रेन्ट बोल्ट आणि रॉस टेलरचा हा फॉर्म बघता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियापुढे नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Published by: Shreyas
First published: June 12, 2021, 9:58 PM IST

ताज्या बातम्या