• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : रोहित शर्माला माहिती आहे न्यूझीलंड टीमची 'कमजोरी'

WTC Final : रोहित शर्माला माहिती आहे न्यूझीलंड टीमची 'कमजोरी'

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) पहिल्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला आहे. भारताचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आपल्याला न्यूझीलंडच्या बॉलिंगची कमजोरी माहिती असल्याचं वक्तव्य केलं आहे.

 • Share this:
  साऊथम्पटन, 18 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) पहिल्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला आहे. साऊथम्पटनमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अजूनही पहिल्या दिवसाचा खेळ सुरू झाला नाही, त्यामुळे टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माने (Rohit Sharma) स्टार स्पोर्ट्ससोबत चर्चा केली. या सामन्यात गोष्टी सरळ ठेवणं गरजेचं असल्याचं रोहित म्हणाला. इंग्लंडमध्ये रोहित शर्मा पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेटमध्ये ओपनिंग करणार आहे, पण न्यूझीलंडच्या बॉलिंग आक्रमणाचा त्याने याआधी अनेकवेळा सामना केला आहे. 'मी न्यूझीलंडच्या बॉलरचा अनेकवेळा सामना केला आहे. त्यांच्या मजबूत बाजू आणि त्यांची कमजोरी मला माहिती आहे. या गोष्टी परिस्थिती, टीमची स्थिती आणि आम्ही पहिले खेळत आहोत का नंतर, यावर अवलंबून आहेत,' असं रोहितने सांगितलं. रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एक हजारापेक्षा जास्त रन केले आहेत. या सामन्यात तुम्ही जास्त विचार न करणंच महत्त्वाचं ठरेल, असं रोहितला वाटतं. तसंच मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटपेक्षा आपल्याला पाच दिवसांचा सामनाच जास्त आवडतो, कारण इकडे तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागतो. इकडे प्रत्येक दिवस वेगळं आव्हान असतं. मोठा काळ खेळण्यासाठी तुम्हाला धैर्य दाखवावं लागतं. तसंच वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये खेळणं सोपं नाही. पाच दिवस तुम्हाला मानसिकदृष्ट्या ताजं तवानं वाटलं पाहिजे. यासाठी तुम्ही शारिरिक दृष्ट्याही फिट असलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली.
  Published by:Shreyas
  First published: