मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

...तर रोहित शर्मा WTC Final मध्ये द्विशतक ठोकेल!

...तर रोहित शर्मा WTC Final मध्ये द्विशतक ठोकेल!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम (Team India) आज रवाना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट टॅम्पियनशीपची फायनल खेळवली जाणार आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 2 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम (Team India) आज रवाना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट टॅम्पियनशीपची फायनल खेळवली जाणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) द्विशतक करू शकतो, अशी भविष्यवाणी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी केली आहे. शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि रोहित शर्मा या दोन्ही आक्रमक खेळाडूंनी इनिंगची सुरुवात करण्यात काहीही धोका नाही, असं राजा म्हणाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या मयंक अग्रवालला (Mayank Agarwal) बाहेर बसवण्यात आलं आणि त्याच्याऐवजी शुभमन गिलला संधी देण्यात आली. यानंतर शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही रोहित शर्मसोबत ओपनिंगला बॅटिंग केली, पण या सीरिजमध्ये त्याला 3 टेस्टमध्ये फक्त 40 रनच करता आले. रमीझ राजा इंडिया न्यूजवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलबाबत बोलत होते. 'जर तुमच्याकडे रोहित आणि गिलसारखी जोडी आहे, तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचं समर्थन केलं पाहिजे. रोहित जर लयीत असेल तर तो फायनलमध्ये द्विशतक करेल,' अशी भाकीत राजा यांनी वर्तवलं. 'बॅट्समन म्हणून रोहित आणि गिल यांना जास्त विचार करायची गरज नाही. फक्त त्यांना त्यांचा स्वाभाविक खेळ खेळावा लागेल. आक्रमक खेळणं टीमसाठी त्यांच्यासाठीही गरजेचं आहे. आक्रमक बॅटिंग हा भारतीय बॅटिंगचा आधार आहे,' अशी प्रतिक्रिया राजा यांनी दिली. 'तुम्हाला हाफ वॉली बॉल टाकला, तर तुम्ही भारतात खेळत असाल किंवा इंग्लंडमध्ये, ड्राईव्ह केला पाहिजे. टेस्टमध्ये पहिला अर्धा तास तुम्ही हलक्या हातांनी बॅटिंग करणं गरजेचं आहे, पण जेव्हा तुम्ही मैदानात वेळ घालवता तेव्हा खुलून बॅटिंग केली पाहिजे. कारण 100 वर्षात याच बॅटिंगला यश मिळालं आहे,' असं राजा म्हणाले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये अजिंक्य रहाणेनंतर (Ajinkya Rahane) रोहित शर्माने सर्वाधिक रन केले आहेत. रहाणेला 1095 रन करता आले तर रोहितने 11 मॅचमध्ये 64.37 च्या सरासरीने 1,030 रन केले आहेत, यामध्ये चार शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. रहाणे आणि रोहित हे दोनच भारतीय आहेत ज्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एक हजारपेक्षा जास्त रन केले. भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) 14 सामन्यांमध्ये 877 रन केले आहेत.
First published:

Tags: Cricket news, New zealand, Rohit sharma, Team india

पुढील बातम्या