मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final : रविंद्र जडेजाने शेयर केली टीम इंडियाची नवी जर्सी, 90 च्या दशकाशी खास नातं

WTC Final : रविंद्र जडेजाने शेयर केली टीम इंडियाची नवी जर्सी, 90 च्या दशकाशी खास नातं

टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठीची (World Test Championship Final) टीम इंडियाची नवी जर्सी चाहत्यांना दाखवली आहे. सोशल मीडियावर जडेजाने या जर्सीचा फोटो शेयर केला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 29 मे : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठीची (World Test Championship Final) टीम इंडियाची नवी जर्सी चाहत्यांना दाखवली आहे. सोशल मीडियावर जडेजाने या जर्सीचा फोटो शेयर केला आहे. या जर्सीचा लूक 90 च्या दशकातल्या जर्सीसारखा आहे. या फोटोला जडेजाने कॅप्शनही तसंच दिलं आहे. 90 च्या दशकाची आठवण, मला ही जर्सी खूप आवडली, असं जडेजा म्हणाला.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पुढच्या महिन्यात 18 ते 22 जूनदरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय टीम 2 जूनला इंग्लंडला रवाना होईल. या मॅचसाठी निवड झालेले खेळाडू सध्या मुंबईत क्वारंटाईन झाले आहेत, यात जडेजाचाही समावेश आहे. जडेजाने आयपीएल 2021 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. बॅटसोबतच बॉलिंगमध्येही त्याचं प्रदर्शन चांगलं राहिलं.

आयपीएल (IPL 2021) रद्द होण्याआधी जडेजाने बँगलोरविरुद्धच्या सामन्यात 28 बॉलमध्ये 62 रनची वादळी खेळी केली होती. या मॅचमध्ये त्याने हर्षल पटेलच्या 6 बॉलमध्ये 5 सिक्स मारले होते, ज्यामुळे एका ओव्हरमध्ये तब्बल 37 रन आले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर भारतीय टीम इंग्लंडविरुद्ध पाच टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. 4 ऑगस्टपासून या सीरिजला सुरुवात होईल, तर अखेरची टेस्ट 10 सप्टेंबरपासून सुरू होईल.

अशी आहे टीम इंडिया

रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल, ऋद्धीमान साहा

स्टॅण्डबाय खेळाडू : आवेश खान, अर्झान नागवासवाला, अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा

First published:

Tags: Cricket, Ravindra jadeja, Team india