मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final : इंग्लंडला रवाना होण्याआधी रवी शास्त्रींनी बोलून दाखवली नाराजी, म्हणाले...

WTC Final : इंग्लंडला रवाना होण्याआधी रवी शास्त्रींनी बोलून दाखवली नाराजी, म्हणाले...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम इंग्लंडला रवाना होत आहे, पण इंग्लंडला जायच्या आधीच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 2 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम इंग्लंडला रवाना होत आहे, पण इंग्लंडला जायच्या आधीच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 18-22 जून या कालावधीमध्ये होणार आहे. पण रवी शास्त्री यांच्या मते एवढ्या मोठ्या स्पर्धेचा निर्णय एका फायनलवरून होऊ नये. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये तीन मॅचची फायनल झाली पाहिजे, असं रवी शास्त्री म्हणाले. रवी शास्त्रींनी सांगितलेल्या या कल्पनेला बेस्ट ऑफ 3 असं म्हणतात. यामध्ये फायनलला पोहोचलेल्या टीममध्ये तीन सामने होतात, यातल्या 2 सामने जिंकलेल्या टीमला विजेता घोषित केलं जातं.

'टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 3 मॅचची झाली पाहिजे, फक्त एका मॅचवरून निर्णय घेणं योग्य नाही. आम्ही एका मॅचसाठीही तयार आहोत. या फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच नाही, तर अनेकवेळा कठीण परिस्थितीमधून आम्ही स्वत:ला बाहेर काढलं आणि सीरिज जिंकल्या,' असं शास्त्री म्हणाले.

दुसरीकडे विराट कोहलीनेही (Virat Kohli) आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी तयार असल्याचं सांगितलं. 'फायनलचा आमच्यावर कोणताही दबाव नाही. आम्ही 5-6 वर्ष मेहनत केली आहे, तेव्हा आम्ही फायनलला पोहोचलो. यावेळी आम्ही फायनल एन्जॉय करणार आहोत. आम्ही सामान्य लोकांसारखा विचार करत नाही, जर आमचे विचारही तसेच असतील, तर आम्ही चांगली कामगिरी करू शकणार नाही. माझं काम भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाणं आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही. टीम एकमेकांना किती मदत करते, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.

First published: