• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final मध्ये टीम इंडियाचा पराभव, पाकिस्तानी खेळाडूने उडवली विराटची खिल्ली

WTC Final मध्ये टीम इंडियाचा पराभव, पाकिस्तानी खेळाडूने उडवली विराटची खिल्ली

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला, यानंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला, यानंतर विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला सुरुवात झाली आहे. कोहली भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे, पण कर्णधार म्हणून त्याला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वर्ल्ड कप फायनल आणि आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये कोहलीच्या नेतृत्वात भारताला पराभवाचा धक्का लागला. पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट (Salman Butt) याने विराटच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 'तुम्ही चांगले कर्णधार असू शकता, पण जर तुम्ही एकही ट्रॉफी जिंकत नाही, तर लोक तुम्हाला लक्षात ठेवणार नाहीत. भलेही तुम्ही चांगले कर्णधार असाल आणि तुमच्याकडे योजनाही चांगल्या असतील, पण तुमचे बॉलर या योजनेप्रमाणे खेळू शकले नाहीत. यासाठी नशिबाची साथ मिळणंही गरजेचं असतं. लोक स्पर्धा जिंकणाऱ्यांनाच लक्षात ठेवतात,' असं सलमान बट त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला. विराटच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक 36 टेस्ट जिंकल्या, सोबतच भारताची परदेशातली कामगिरीही सुधारली आहे. 'विराटने फक्त आयसीसी ट्रॉफीच नाही तर त्याला आयपीएलही जिंकता आलेली नाही. तो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, त्याच्याकडे आक्रमकताही आहे. कोहलीची एनर्जीही वेगळ्याच स्तरावर असते. मैदानात उतरताच त्याला सर्वोत्तम कामगिरी करण्याची इच्छा असते, पण नेतृत्व सुक्ष्म असावं, उग्र असू नये. विराट बरेच वेळा मैदानात आक्रमक असतो,' असं वक्तव्य सलमान बटने केलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलनंतर आता टीम इंडिया काही काळ इंग्लंडमध्येच विश्रांती घेणार आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाची इंग्लंडमधली कामगिरी निराशाजनक झाली आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारताचा मागच्या इंग्लंड दौऱ्यात 4-1 ने पराभव झाला होता.
  Published by:Shreyas
  First published: