मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final कोण जिंकणार? वेंगसरकरांनी केली भविष्यवाणी

WTC Final कोण जिंकणार? वेंगसरकरांनी केली भविष्यवाणी

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. या मॅचआधी भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी मोठी भविष्यवाणी केली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 31 मे : भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. या मॅचआधी न्यूझीलंडची टीम इंग्लंडविरुद्ध (New Zealand vs England) दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळेल, या सीरिजचा न्यूझीलंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी फायदा होईल, अशी भविष्यवाणी भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी केली. क्रिकेटनेक्स्टसोबत दिलीप वेंगसरकर बोलत होते. भारताने इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज 2007 साली जिंकली होती, त्यावेळी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीमचा कर्णधार होता, तर वेंगसरकर निवड समितीचे अध्यक्ष होते. यानंतर भारत इंग्लंडमध्ये तीन टेस्ट सीरिज खेळला. या तीन टेस्ट सीरिजमध्ये भारताचा 0-4, 1-3 आणि 1-4 ने पराभव केला. 2018 साली विराटच्याच नेतृत्वात भारताचा इंग्लंडमध्ये पराभव झाला होता. 'टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी हा मोठा मोसम आहे. बायो-बबलमध्ये राहणं कठीण आहे, पण टीम इंडियाने गेल्या काही दिवसांमध्ये चांगली कामगिरी केली. इंग्लंडमधली सीरिज रंजक होईल. तिथल्या परिस्थिती आणि वातावरणाशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे. तिकडे खेळपट्टीवर जास्त काळ घालवणं गरजेचं आहे. आम्हाला हा फायदा मिळायचा, कारण आम्ही सीरिजच्या आधी आणि सीरिजच्या मध्ये काऊंटी क्रिकेट खेळायचो, त्यामुळे परिस्थितीनुसार बदलण्याची आम्हाला संधी मिळायची,' असं वेंगसरकर म्हणाले. 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्याआधी न्यूझीलंड इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. फायनल त्यांच्यासाठी इंग्लंडमधली तिसरी टेस्ट असेल, तर आपली पहिलीच असेल, याचा न्यूझीलंडला फायदा होईल, पण भारताकडे चांगली बॅटिंग आहे, त्यांनी जर स्वत:च्या क्षमतेनुसार खेळ केला, तर टीमची कामगिरी नक्कीच चांगली होईल,' असं वेंगसरकरांना वाटतं. दिलीप वेंगसरकर यांनी भारताच्या इंग्लंड दौऱ्याच्या वेळापत्रकाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 'हे वेळापत्रक बघून हैराण झालो. अशाप्रकारे एखाद्या दौऱ्याचं आयोजन कसं केलं जाऊ शकतं? तुम्ही दीड महिने क्रिकेट खेळणार नाही, त्यानंतर टेस्ट सीरिज कशी खेळणार? पाकिस्तान आणि श्रीलंका जुलै महिन्यात मर्यादित ओव्हरच्या सीरिजसाठी इंग्लंडला जाईल. भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर दीड महिना तिकडे काय करणार आहे? या कालावधीमध्ये त्यांनी काऊंटी मॅच खेळल्या पाहिजे. दीड महिना खूप जास्त कालावधी आहे. एवढ्या दिवसानंतर तुम्ही अचानक टेस्ट सीरिज खेळायला सुरुवात कराल तर वेगळंच वाटेल,' असं वेंगसरकर म्हणाले. 'ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीमने केलेली कामगिरी सर्वोत्कृष्ट होती, जेव्हा खेळाडू फिट नव्हते तेव्हा युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली,' असं वक्तव्य वेंगसरकरांनी केलं. भारताकडे चांगल्या बॅटिंगशिवाय चांगली बॉलिंगही आहे, त्यामुळे भारताला इंग्लंडविरुद्धची सीरिज जिंकण्याची चांगली संधी असल्याचं वेंगसरकरांना वाटतं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Team india

    पुढील बातम्या