WTC Final मध्ये मुंबईकर खेळाडू भारतासाठी ठरणार धोकादायक!

WTC Final मध्ये मुंबईकर खेळाडू भारतासाठी ठरणार धोकादायक!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) न्यूझीलंडने आपल्या 15 खेळाडूंच्या टीमची घोषणा केली आहे. 18-22 जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात हा सामना रंगेल.

  • Share this:

साऊथम्पटन, 15 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (World Test Championship Final) न्यूझीलंडने आपल्या 15 खेळाडूंच्या टीमची घोषणा केली आहे. 18-22 जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात हा सामना रंगेल. न्यूझीलंडने त्यांच्या टीममध्ये डावखुरा स्पिनर एजाज पटेल (Azaz Patel) याचा समावेश केला आहे. मूळचा भारतीय असलेल्या एजाज पटेलने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या, त्यामुळे फायनलमध्ये त्याला अंतिम-11 खेळाडूंमध्ये संधी मिळू शकते. शेवटचे दोन दिवस साऊथम्पटनची खेळपट्टी स्पिन बॉलरना मदत करेल, असा अंदाज आहे.

एजाज पटेलचा जन्म मुंबईमध्ये जाला, पण तो 8 वर्षांचा असताना कुटुंबासोबत न्यूझीलंडला गेला आणि तिकडेच स्थायिक झाला. सुरुवातीला तो डावखुरा फास्ट बॉलर होता, पण काही काळानंतर त्याने स्पिन बॉलिंग करायला सुरुवात केली. 32 वर्षांच्या एजाजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. किवी टीमकडून तो टेस्ट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय खेळला आहे.

एजाज पटेल टेस्ट में 26 विकेट ले चुके हैं. (AP)

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टआधी मिचेल सॅन्टनरला दुखापत झाल्यानंतर एजाज पटेलला खेळवण्यात आलं. 16 महिन्यांनंतर त्याला टेस्ट खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 14 ओव्हर टाकून 34 रन देत 2 विकेट घेतल्या, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 9 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 2 विकेट आपल्या नावावर केल्या.

एजाज पटेलने न्यूझीलंडकडून 9 टेस्टमध्ये 26 विकेट घेतल्या आहेत, यात दोन वेळा इनिंगमध्ये 5 विकेटचा समावेश आहे. तसंच दोन टी-20 सामन्यांमध्ये त्याला एक विकेट मिळाली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 67 मॅचमध्ये 248 विकेट पटकावल्या, यात 18 वेळा 5 विकेट आणि 3 वेळा 10 विकेट आहेत. याशिवाय त्याने एका अर्धशतकासह 14 च्या सरासरीने 972 रन केले.

साऊथम्पटनच्या मैदानात आतापर्यंत 6 टेस्ट झाल्या आहेत. यात बॉलरना 161 विकेट मिळाल्या, ज्यातल्या 120 फास्ट बॉलरनी आणि 41 स्पिनरनी घेतल्या आहेत. 5 वेळा फास्ट बॉलरनी तर 2 वेळा स्पिन बॉलरनी 5-5 विकेट मिळवल्या. या मैदानात 3 मॅचचा निकाल लागला आणि 3 मॅच ड्रॉ झाल्या.

Published by: Shreyas
First published: June 15, 2021, 8:19 PM IST

ताज्या बातम्या