• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : भारतीयांकडून ट्रोल व्हायची एकही संधी मायकल वॉन सोडत नाही!

WTC Final : भारतीयांकडून ट्रोल व्हायची एकही संधी मायकल वॉन सोडत नाही!

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) सोशल मीडियावर कायमच ऍक्टिव्ह असतो, पण यातला त्याचा बराचसा वेळ टीम इंडियाबद्दल (Team India) बोलण्यात आणि भारताच्या खेळाडूंवर निशाणा साधण्यातच जातो, ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येतं.

 • Share this:
  मुंबई, 18 जून : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) सोशल मीडियावर कायमच ऍक्टिव्ह असतो, पण यातला त्याचा बराचसा वेळ टीम इंडियाबद्दल (Team India) बोलण्यात आणि भारताच्या खेळाडूंवर निशाणा साधण्यातच जातो, ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येतं. यावेळीही मायकल वॉनने टीम इंडियाला पुन्हा एकदा डिवचलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलबाबत (World Test Championship Final) मायकल वॉनने ट्वीट केलं. भारतीय टीम कमजोर आहे, असं सांगण्याचा मायकल वॉनने प्रयत्न केला. मायकल वॉनच्या या ट्वीटनंतर भारतीय चाहत्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. मला वाटतं हवामानाने भारतीय टीमला वाचवलं, असं मायकल वॉन म्हणाला. याचसोबत त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा हॅशटॅगही वापरला. मायकल वॉनच्या या ट्वीटचा भारतीय चाहत्यांनी समाचार घेतला. एका यूजरने इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजयावर टोला हाणला. इंग्लंडने बाऊंड्री नियमाच्या आधारावर वर्ल्ड कप जिंकला होता, यावरून अभिषेक नावाचा यूजर म्हणाला, हो ज्याप्रकारे इंग्लंडने वर्ल्ड कप बाऊंड्रीमुळे जिंकला होता. vaughan trolled एकाने तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल भारतच जिंकेल, अशी भविष्यवाणी केली. भारत-न्यूझीलंड यांच्यातली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये होत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. पहिल्या दिवशी टॉसही पडला नाही.
  Published by:Shreyas
  First published: